दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नंबरवरून आलेल्या दुर्वर्तनात्मक दूरध्वनीविषयी दूरसंचार विभागाकडून सूचना जारी
अशा दूरध्वनींची तक्रार दूरसंचार सेवा प्रदात्यांना किंवा दूरसंचार विभागाकडे करण्याचे केले आवाहन
Posted On:
04 JAN 2024 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2024
दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने नागरिकांना भारतातील शेअर बाजार आणि ट्रेडिंग मध्ये व्यत्यय आणण्याबाबत दावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणाऱ्या दुर्वर्तनात्मक दूरध्वनीबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने असे द्वेषयुक्त दूरध्वनी देशविरोधी घटकांकडून केले जातात.
दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना अशा क्रमांकांवरून आलेले द्वेषयुक्त दूरध्वनी ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी, असे दूरध्वनी आल्यास, दूरसंचार विभागाकडे
help-sancharsaathi[at]gov[dot]in येथे किंवा त्यांच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993174)
Visitor Counter : 106