शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाकडून 'प्रेरणा' कार्यक्रमाचा प्रारंभ

Posted On: 04 JAN 2024 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 'प्रेरणा : अनुभवात्मक अध्ययन कार्यक्रम' सुरू केला आहे. सर्व सहभागींना अर्थपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, हा यामागचा उद्देश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 ची आधारशीला असलेले  मूल्याधारित शिक्षणाचे तत्त्वज्ञान आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या तत्त्वांचे एकात्मीकरण याप्रती दृढ वचनबद्धतेने प्रेरणा प्रेरित आहे.

नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा हा आठवडाभराचा निवासी कार्यक्रम आहे. तंत्रज्ञानात सर्वोत्तम  असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अनुभवात्मक आणि प्रेरणादायी शिक्षण कार्यक्रम आहे. वारसा आणि नवाचार यांचा संगम यात आहे.   देशाच्या विविध भागातून दर आठवड्याला 20 निवडक विद्यार्थ्यांची तुकडी (10 मुले आणि 10 मुली) या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

दिवसनिहाय कार्यक्रमाच्या वेळापत्रकात योग, उत्फुल्लता  आणि ध्यान सत्रे, त्यानंतर अनुभवात्मक अध्ययन , संकल्पनात्मक सत्रे आणि मनोरंजक शिक्षण क्रियाकलाप असतील. संध्याकाळच्या उपक्रमांमध्ये  सर्वांगीण शिक्षणाचा दृष्टिकोन सुनिश्चित करत  प्राचीन आणि वारसा स्थळांना भेटी, प्रेरणादायी चित्रपट पाहणे , मिशन लाईफ  सर्जनशील क्रियाकलाप, टॅलेंट शो इत्यादींचा समावेश असेल. या व्यतिरिक्त, विद्यार्थी  स्वदेशी ज्ञान प्रणाली, नवीनतम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून शिकण्यासारख्या विविध क्रियाकलापांमध्ये सहभागी होतील.

यासाठी विद्यार्थी पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. यात  अर्जदार महत्त्वाकांक्षी आणि आकांक्षी  प्रेरणा कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी आवश्यक तपशील भरतील. नोंदणीकृत अर्जदार पोर्टलवर विहित केलेल्या निवड प्रक्रियेतून जातील. आपल्या राष्ट्राचे भविष्य घडविण्यास उत्सुक असलेल्या अष्टपैलू  व्यक्तिमत्त्वांचे मूल्यमापन करण्यासाठीच्या  प्रेरणाच्या तत्त्वावर आधारित विविध उपक्रमांद्वारे नियोजित  ‘प्रेरणा उत्सव’ दिवशी शाळा/तालुका स्तरावर आयोजित  निवड प्रक्रियेत अर्जदारही सामील होऊ शकतात.

निवड झाल्यावर, 20 सहभागी (10 मुले आणि 10 मुली) प्रेरणा कार्यक्रमात सहभागी होतील आणि प्रेरणा, नवोन्मेष  आणि आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करतील.

प्रेरणासाठी नोंदणी करण्यासाठी, नववी ते बारावीचे विद्यार्थी prerana.education.gov.in ला भेट देऊ शकतात.

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1993165) Visitor Counter : 628