कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यावसायिक लिलावांतर्गत वाटप केलेल्या खाणींमधील उत्पादनाचा कोळसा मंत्रालयाकडून आढावा

Posted On: 04 JAN 2024 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

 

व्यावसायिक कोळसा खाणींमधील उत्पादन आणि भावी काळातील अपेक्षित उत्पादनांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि नामांकित अधिकारी एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली  एका उच्च स्तरीय बैठकीचे 3-1-2024 रोजी येथे आयोजन करण्यात आले.  या बैठकीत त्यांनी कोळसा खाणधारकांची कोळसा उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाल्याबद्दल प्रशंसा केली आणि आर्थिक वर्ष 2023-24 चे कोळसा उत्पादनाचे समर्पित लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची सूचना केली.

31 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 50 कॅप्टीव्ह/व्यावसायिक कोळसा खाणींमध्ये उत्पादन सुरू आहे आणि त्यापैकी 32 खाणींचे वाटप ऊर्जा क्षेत्रामध्ये, 11 खाणींचे बिगर नियंत्रित क्षेत्रात आणि सात खाणींचे कोळसा विक्रीसाठी करण्यात आले आहे. 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला सुरुवात झाल्यानंतर सहा खाणींनी 14.87 दशलक्ष टन क्युम्युलेटिव्ह पीक रेटेड क्षमतेसह (PRC) यापूर्वीच उत्पादन सुरू केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून 14.04 दशलक्ष टन उत्पादन झाले, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 10.14 दशलक्ष टनांच्या तुलनेत 38 टक्क्यांनी जास्त होते.  त्याचबरोबर याच काळात कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून 13.32 दशलक्ष टन कोळशाची पाठवणी करण्यात आली जी डिसेंबर 2022 मधील 9.58 दशलक्ष टनांच्या तुलनेत 39 टक्क्यांनी जास्त होती. डिसेंबर 2023 मध्ये कोळशाची सरासरी दैनंदिन पाठवणी 4.3 लाख टन प्रतिदिन होती.    

1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या काळात कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक कोळसा खंडांमधून कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी यामध्ये उल्लेखनीय वाढ दिसून आली आहे. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या काळात कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून 98 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले तर103 दशलक्ष टन कोळसा पाठवण्यात आला. त्यामुळे उत्पादन आणि पाठवणी यामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच काळाच्या तुलनेत अनुक्रमे 26 टक्‍के आणि 32 टक्के वार्षिक वाढ दिसून आली.

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1993158)