युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ 2023 ची केली घोषणा

Posted On: 04 JAN 2024 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज 'राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 ची घोषणा केली. विजेत्यांना राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

खेळांचे संवर्धन आणि विकास यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्था, स्वयंसेवी संस्था, क्रीडा नियामक मंडळे, कॉर्पोरेट (खासगी व सार्वजनिक क्षेत्र  ) संस्था, यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो.

यासाठीचे अर्ज ऑनलाईन मागवले जातात आणि समर्पित ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून खेळाडू/प्रशिक्षक/ संस्था यांना स्वयं आवेदनाची परवानगी आहे. समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे:

पुरस्काराचे नाव: राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023

क्र.

श्रेणी

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2023 प्राप्त संस्था

1.

नवोदित / तरुण प्रतिभेची ओळख आणि संवर्धन

जैन अभिमत विद्यापीठ, बंगळुरू

2.

कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन

ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेड

पुरस्कार विजेत्यांना 9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते  पुरस्कार प्रदान केले जातील.

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1993104) Visitor Counter : 166