सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
यशोगाथा-पी. एम. ई. जी. पी. कर्जसहाय्यामुळे उद्योगांच्या वाढीला मदत
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2024 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024
सी. ए. डी.-सी. ए. एम. मध्ये एम. टेक पूर्ण केल्यानंतर बेरोजगार असलेला सुमित राऊत हा युवक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात होता. नोकरीच्या शोधात असतानाच नागपूरच्या उद्योग भवन येथे एम. सी. ई. डी. वरील प्रशिक्षण कार्यक्रमाला तो उपस्थित राहिला. तिथे त्याला वर्ध्यातील एम. जी. आय. आर. आय.ची माहिती मिळाली. त्याने तातडीने एम. जी. आय. आर. आय. कडे धाव घेतली आणि विविध विभागांनी पुरवलेल्या विविध प्रशिक्षण/तंत्रज्ञानाची सर्व माहिती गोळा केली. त्याने कोरफड आधारित उत्पादनांसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे ठरवले. कारण त्याच्याकडे काही एकर शेती आहे. तिथे कोरफडीची लागवड करून त्याचे प्रक्रिया युनिट सुरू करणे शक्य होते. मे 2016 मध्ये त्याने जैव-प्रक्रीया आणि वनौषधी विभागात डॉ. आदर्श कुमार अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोरफड आधारित उत्पादनाचे 5 दिवसांचे प्रशिक्षण घेतले.
बी अँड एच विभागात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याने आपल्या शेतात कोरफडीची लागवड केली आणि हँड वॉश, शॅम्पू, मॉइश्चरायझिंग जेल आणि ज्यूस यासारख्या कोरफड आधारित उत्पादनांचे उत्पादन सुरू केले. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्व उत्पादनांचे उत्पादन वाढवण्याची योजना आखली. त्यासाठी काही यंत्रे आणि बऱ्यापैकी मोठी यंत्रणा आवश्यक होती; त्याने पी. एम. ई. जी. पी. योजनेअंतर्गत कर्ज घेतले आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, डी. टी. येथे 'महालक्ष्मी अॅग्रो प्रॉडक्ट्स' या नावाने एक युनिट स्थापन केले. त्याने 6 जणांना नोकरी दिली आहे. त्याचे मासिक उत्पन्न सुमारे 1 लाख रुपये आहे.
तो एम. जी. आय. आर. आय. च्या नियमित संपर्कात असून आवश्यक असेल तेव्हा तांत्रिक मार्गदर्शन घेतो.
R.Aghor/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1992851)
आगंतुक पटल : 142