सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
यशोगाथा - लोणची उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण
Posted On:
03 JAN 2024 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024
वर्ध्यातील सावंगी मेघे येथील मास्टर कॉलनी परिसरातील, केवळ उच्च माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या प्रवीण थूल या 41 वर्षीय तरुणाने, वर्ध्यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्या (MGIRI) जैव प्रक्रिया आणि हर्बल विभागातून, एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीत डॉ.अपराजिता वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली, "विविध प्रकारची लोणची" तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. वर्ध्यात या युवकाचे किराणा मालाचे दुकान होते. आणि तो घरगुती पातळीवर काही लोणची तयार देखील करत होता. परंतु त्याला त्याने तयार केलेल्या लोणच्यांच्या चवीमध्ये सातत्य राखता येत नव्हते. ही अडचण सोडवण्यासाठी त्यांनी वर्ध्यातील "जिल्हा उद्योग केंद्र" ला भेट दिली. यावेळी त्यांना महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती मिळाली.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्या येथील प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, त्यांनी वर्ध्यातील सावंगी मेघे येथील मास्टर कॉलनी येथे दररोज 100 किलो क्षमतेसह विविध प्रकारची लोणची तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या विविध प्रकारच्या लोणच्यांची मासिक उलाढाल सुमारे दीड लाख रुपये असून यापैकी सुमारे 40-45 हजार रुपये त्यांचा नफा आहे. ते आपल्या उद्योगाद्वारे 40 जणांना रोजगार देत आहेत. त्यांनी मुद्रा कर्ज योजनेंतर्गत आर्थिक मदत घेतली आहे. व स्थानिक आणि राज्य स्तरावर ते "सुमेधा गृह उद्योग" या ब्रँड नावाने आपल्या उत्पादनाची विक्री करतात.
लोणची उत्पादन सुरू केल्यानंतर त्यांना उत्पादनात काही अडचणी आल्या आणि महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेने त्यांना बायो-प्रोसेसिंग आणि हर्बल विभागात त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्यांची समस्या सोडवली. बायो-प्रोसेसिंग आणि हर्बल विभागाद्वारे लोणची उत्पादनात ते नियमितपणे तांत्रिक सहाय्य घेत आहेत आणि भविष्यात देखील त्यांना तांत्रिक सहाय्य केले जणार आहे.
त्यांना त्यांचा व्यवसाय छोट्या पासून मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे.सध्या ते प्रामुख्याने आंब्याचे लोणचे, मिरचीचे लोणचे, लिंबाचे लोणचे आणि गाजराचे लोणचे बनवत आहेत.लवकरच ते इतर प्रकारच्या लोणच्याचे उत्पादनही सुरू करतील.
R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992838)