आयुष मंत्रालय
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेतील सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकात शेकडो योगप्रेमींचा सहभाग
Posted On:
02 JAN 2024 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2024
आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने (एमडीएनआयवाय), आज या संस्थेत सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील शेकडो योग प्रेमी सहभागी झाले होते.
यावेळी आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या संचालक विजयालक्ष्मी भारद्वाज देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, एमडीएनआयवाय चे विद्यार्थी आणि योग प्रेमी सहभागी झाले होते.

सूर्यनमस्कार ही एक आध्यात्मिक साधना, आसन, प्राणायाम आणि ध्यान पद्धत आहे. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक पायरीचा स्वतःचा मंत्र असतो आणि त्याचा थेट परिणाम शरीराच्या महत्वाच्या उर्जेवर (प्राण) होतो. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावाने मानसिक आणि शारीरिक संतुलन वाढण्यास मदत होते. हा क्रम मनाची एकाग्रता आणि स्थिरता निर्माण करण्याबरोबरच स्नायू आणि अवयवांना बळकट करतो.
हे सूर्यनमस्कार सामूहिक प्रदर्शन म्हणजे आयुष मंत्रालयाने 1 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान (मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या उत्तर गोलार्धात प्रवेशाच्या निमित्ताने) भारतातील विविध सूर्य मंदिरांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचा भाग आहे.
एकाच वेळी 108 ठिकाणी यशस्वीरित्या आयोजन केल्यानंतर आणि गुजरातमध्ये सूर्यनमस्कारासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्यानंतर; मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने सातत्य राखण्यासाठी या मालिकेतील दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता.
सूर्यनमस्कार हा 8 आसनांचा समूह आहे जो शरीर आणि मनाच्या समन्वयाने 12 चरणांमध्ये केला जातो. सूर्यनमस्कार सकाळी लवकर (सूर्योदय) घालतात.
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या संकुलात 500 हून अधिक योग अभ्यासकांनी सूर्यनमस्कार घातले. या कार्यक्रमाचे चित्रीकरण दूरदर्शनने केले आणि आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील तो प्रसारित करण्यात आला.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992540)
Visitor Counter : 159