कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

10.75% वाढ नोंदवत डिसेंबर 2023 मध्ये, कोळसा उत्पादन 92.87 दशलक्ष टनांवर पोहोचले


आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये डिसेंबर पर्यंत एकत्रित उत्पादनाने 12.47% वाढ नोंदवली आणि ते 684.31 मेट्रिक टन इतके झाले

Posted On: 02 JAN 2024 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2024

 

एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून डिसेंबर 2023 मध्ये 92.87 दशलक्ष टन (MT) पर्यंत इतके उत्पादन झाले असून मागील वर्षीच्या 83.86 MT या आकडेवारीला मागे टाकत 10.75% ची वाढ दर्शवत आहे, असे कोळसा मंत्रालयाने जाहीर केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोल इंडिया लिमिटेडचे (CIL) उत्पादन 8.27% च्या वाढीसह 71.86 MT इतके झाले आहे, जे डिसेंबर 2022 मध्ये  66.37 MT इतके झाले  होते. आर्थिक वर्ष 23-24 या वर्षाअखेरीस संचयी कोळसा उत्पादनात (डिसेंबर 2023 पर्यंत)12.47% ची मोठी वाढ  झाली असून  684.31 मेट्रिक टन इतके उत्पादन झाले आहे, जे गतवर्षीच्या (आर्थिक वर्ष 22-23) याच कालावधीत 608.34 एमटी पर्यंत झाले होते.

डिसेंबर 2023 मध्ये कोळशाच्या प्रेषणात गतवर्षीच्या तुलनेत 8.36% इतकी वाढ झाली असून ते 86.23 MT पर्यंत पोहोचले, डिसेंबर 2022 मध्ये नोंदवलेल्या 79.58 MT च्या तुलनेत  उल्लेखनीय प्रगती झाल्याचे ही वाढ दर्शविते.डिसेंबर 2023 मध्ये 5.49% ची वाढ दर्शवत 66.10MT इतके कोल इंडिया लिमिटेडचे प्रेषण  (CIL) झाले,जे डिसेंबर 2022 मध्ये62.66 MT इतके होते.संचयी कोळशाच्या प्रेषणात आर्थिक वर्ष 22-23 मधील 637.40 MT च्या तुलनेत,‌आर्थिक 23-24 मध्ये 11.36 % इतकी लक्षणीय वाढ यात झाली असून, (डिसेंबर 2023 पर्यंत) ते 709.80 MT इतके झाले आहे.

कोळसा क्षेत्रामध्ये अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे, ज्यामध्ये उत्पादन, प्रेषण आणि साठा याची पातळी उल्लेखनीय उंचीवर गेली आहे. या वाढीचे श्रेय कोळसा  क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांना (PSUs) असून त्यांनी  ही प्रगती साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे उपक्रम कोळसा पुरवठा साखळीची बांधिलकी अधोरेखित करत, देशभरात कोळशाचे अखंड वितरण सुनिश्चित करतात.

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1992383) Visitor Counter : 120