आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भव अभियान
या मोहिमेअंतर्गत 5 कोटींहून अधिक आभा (ABHA) खाती तयार केली
आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावा आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावा अशा एकूण 13,84,309 आरोग्य मेळ्यांव्यांना भेट देणाऱ्यांच्या संख्येने एकूण 11 कोटींचा आकडा केला पार.
6,41,70,297 लोकांना मोफत औषधे आणि 5,10,48,644 लोकांना मोफत निदान सेवा मिळाल्या
गरोदरपणातील पहिल्या तिमाहीत असलेल्या 45,43,705 मातांनी नोंदणी केली आणि पहिली प्रसूती पूर्व तपासणी केली आणि 29,83,565 माता आणि 49,44,359 बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
Posted On:
29 DEC 2023 11:26AM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या आयुष्मान भव मोहिमेत, एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, आतापर्यंत 5 कोटींहून अधिक रुग्णांसाठी आभा (ABHA) खाती तयार करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, एकूण 4,44,92,564 आयुष्मान कार्ड तयार केली गेली आहेत आणि तसेच यानिमित्ताने 1,15,923 आयुष्मान सभा आयोजित करण्यात आल्या.ही माहिती दिनांक 28.12.2023 पर्यंत प्राप्त झालेली आहे.
सध्या सुरू असलेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत, आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावे आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावे यांची एकत्रित संख्या दिनांक 28.12.2023 पर्यंत 13,84,309 इतकी असून या आरोग्य मेळाव्यांना भेट देणाऱ्यांची संख्या 11,30,98,010 पर्यंत पोहोचली आहे.
आरोग्य मेळाव्यात खालील उपक्रम राबवले जातात.
आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावे:
आतापर्यंत आयुष्मान आरोग्य मंदिर या योजनेद्वारे 13,49,356 मेळावे यशस्वीरित्या आयोजित केले असून त्यांना एकूण 9,76,56,060 नागरिकांनी भेट दिली आहे. या मेळ्यांमध्ये 9,21,783 निरोगी स्वास्थ्य, योग, ध्यान यासह एकूण 1,02,90,345 जणांसाठी दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्लामसलत करण्यात आली. 6,41,70,297 लोकांना मोफत औषधे आणि 5,10,48,644 लोकांना मोफत रुग्णनिदान सेवा मिळाली आहे. 74,04,356 लोकांना आयुष सेवा मिळाली आणि 10,99,63,891 लोकांना निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक बदल याविषयी समुपदेशन करण्यात आले. गरोदरपणातील पहिल्या तिमाहीत असलेल्या 45,43,705 मातांनी या मेळाव्यांत नोंदणी केली आणि प्रथमच त्यांच्या रक्तातील संपूर्ण न्यूट्रोफिल काउंट (प्रसूतीपूर्व ANC) तपासणी पूर्ण केली तसेच 29,83,565 माता आणि 49,44,359 मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.18,94,71,490 नागरिकांच्या 7 प्रकारच्या प्रार्थमिक तपासण्या (स्क्रीनिंग -क्षय , उच्च रक्तदाब, मधुमेह, मुखकर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मोतीबिंदू) तपासणी करण्यात आल्या.ही माहिती 28.12.2023 पर्यंतच्या अहवालानुसार मिळाली आहे.
सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावा (कम्युनिटी हेल्थ सेंटर मेळावे,CHC): 37,664 सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या मेळाव्यांतून 1,54,41,950 लोकांची नोंदणी झाली आहे. 1,10,05,931 रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागातील प्रार्थमिक (OPD) सल्ला घेतला आहे तर 49,67,675 रुग्णांनी तज्ञ डॉक्टरांचा विशेष (OPD) सल्ला घेतला आहे. 38,309 मोठ्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया आणि 1,30,760 लहान शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आल्या आहेत. माहिती 28.12.2023 पर्यंतच्या अहवालानुसार मिळाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आयुष्मान भव आरोग्य मेळा आयोजित केला आहे
जम्मू-काश्मीरमध्ये आयुष्मान भव आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे
कर्नाटकमध्ये आयुष्मान भव आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे
हरियाणामध्ये आयुष्मान भव आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1991476)
Visitor Counter : 156