परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
न्यूझीलंड मध्ये ऑकलंड येथे भारताचा महावाणिज्य दूतावास उघडायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
27 DEC 2023 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने न्यूझीलंड मध्ये ऑकलंड येथे भारताचा महावाणिज्य दूतावास उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
ऑकलंडमध्ये भारताचा महावाणिज्य दूतावास उघडल्याने भारताचा राजनैतिक प्रभाव वाढायला मदत होईल आणि भारताच्या जागतिक स्तरावरील वाढत्या महत्वाच्या अनुषंगाने, राजनैतिक प्रतिनिधित्वही मजबूत होईल. भारताच्या धोरणात्मक आणि व्यावसायिक हितसंबंधांना चालना देण्यासाठी आणि ऑकलंडमधील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी ते उपयोगी ठरेल.
ऑकलंडमधील भारताचा हा महावाणिज्य दूतावास उघडण्याची आणि पूर्णपणे कार्यान्वित होण्याची प्रक्रिया येत्या बारा महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1990856)
Visitor Counter : 101