पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
25 DEC 2023 9:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली. राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, वाजपेयी हे नेहमीच प्रेरणेचे स्रोत राहतील.
आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
'माजी पंतप्रधान, आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजींना त्यांच्या जयंतीदिनी मी देशातील सर्व कुटुंबातील सदस्यांच्या वतीने आदरांजली वाहतो. राष्ट्र उभारणीला गती देण्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. भारतमातेसाठीचे त्यांचे समर्पण आणि सेवा अमृतकाळातही प्रेरणास्रोत राहील".
***
NM/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1990200)
Visitor Counter : 120
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam