पंतप्रधान कार्यालय

गोव्याचा झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गोवेकरांचे केले अभिनंदन

Posted On: 23 DEC 2023 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2023

गोव्यातला झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवेकरांचे अभिनंदन केले आहे.

या पूलामुळे दळणवळण व्यवस्था सुधारून गोव्यात पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

"झुआरी पूल पूर्णपणे कार्यरत झाल्याबद्दल, गोवेकरांचे अभिनंदन! ह्या महत्वाच्या प्रकल्पामुळे, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दळणवळण व्यवस्था सुधारेल, पर्यायाने, येत्या काळात या प्रदेशातील वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल. 

M.Pange/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1989926) Visitor Counter : 84