युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी योजना

Posted On: 21 DEC 2023 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत युवा व्यवहार विभाग व्यक्तिमत्व जडणघडण आणि राष्ट्र-उभारणीच्या दुहेरी उद्दिष्टांची अंमलबजावणी करतो, उदाहरणार्थ राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत स्वेच्छा समुदाय सेवेच्या माध्यमातून युवा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याचे काम केले जाते. ‘सेवेद्वारे शिक्षण’ हा एनएसएसचा उद्देश आहे.

नेहरू युवा केंद्र संघटना आपल्या विविध कार्यक्रम आणि योजनांद्वारे युवकांच्या सक्षमीकरणासाठी आणि नागरी सहभागासाठी प्रयत्नशील आहे. 52.11 लाख युवा सदस्यांसह गावांमधील 3.04 लाख युथ क्लबच्या  विद्यमान नेटवर्कमधून  युवकांमधील त्यांचा वाढता विस्तार दिसून येतो.

युवा व्यवहार विभागाच्या अंतर्गत  मेरा युवा भारत (MY भारत) ही एक स्वायत्त संस्था एक व्यापक सक्षम यंत्रणा म्हणून स्थापन करण्यात आली असून अमृत काळ  दरम्यान युवकांच्या विकासासाठी आणि 'कर्तव्य बोध' आणि 'सेवाभाव' द्वारे युवा प्रणित विकासासाठी त्याला तंत्रज्ञानाची जोड आहे. हा मंच युवकांना सरकारी विभागांमधील कार्यक्रम आणि शिकण्याच्या संधींशी जोडतो. अशा प्रकारच्या सहभागामुळे युवकांमध्ये स्थानिक समुदायाच्या समस्यांबद्दलची समज वाढेल आणि त्यांना विधायक उपाय शोधण्यात मदत करेल आणि परिणामी युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज राज्यसभेत डॉ. सुमेरसिंग सोलंकी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1989405) Visitor Counter : 117