श्रम आणि रोजगार मंत्रालय

राष्ट्रीय करियर सेवा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या 10.45 लाखांहून रिक्त पदांमुळे नोकरीच्या संधी उपलब्ध

Posted On: 21 DEC 2023 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

 

देशातील नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरी शोधणे आणि योग्य नोकरी मिळणे, करियरविषयक मार्गदर्शक सल्ला, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांविषयी माहिती इत्यादी करियरशी संबंधित विविध सेवा डिजिटल मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता याव्या म्हणून केंद्र सरकारने  राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टल [www.ncs.gov.in] सुरु केले आहे. योग्य व्यक्तीला योग्य पदावरील नोकरी मिळावी या हेतूने एनसीएस पोर्टल नोकरीच्या शोधात असणारे आणि नोकऱ्या देणारे यांना एका मंचावर घेऊन येते, देशातील आकांक्षित युवकांना नोकरीच्या सन्माननीय संधी उपलब्ध करून देते आणि करियर विकासासाठी मदत उपलब्ध करून देते.

एनसीएस पोर्टलची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. नोकरी शोधणाऱ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 1100 हून अधिक मान्यताप्राप्त करियर सल्लागार
  2. 3600 हून अधिक प्रकारच्या नोकऱ्यांबाबत करियरची माहिती देणारा माहितीकोष
  3. रोजगारविषयक पात्रतेच्या चाचणीसाठी ऑनलाइन रोजगार पात्रता कौशल्य मूल्यमापन
  4. डिजिटल आणि इतर सॉफ्ट स्किल्स साठी ऑनलाइन रोजगार पात्रता सुधारण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाची सुविधा
  5. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची माहिती सामायिक करण्यासाठी 28 राज्यांच्या (एनसीएसचा थेट वापर करणाऱ्या 7 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह) रोजगार पोर्टल्सचे एकत्रीकरण
  6. रिक्त पदांच्या  सामायीकीकरणा साठी विविध खासगी रोजगार पोर्टल्सशी एकत्रीकरण
  7. नियोक्त्यांचे ऑटो रजिस्टरिंग करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे उद्यम पोर्टल, ईपीएफओ आणि ईएसआयसी यांच्यासह एकत्रीकरण

दिनांक 18.12.2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार, एनसीएस पोर्टलवर 10.45 लाखांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांत नोंदणी झालेले नियोक्ते आणि रिक्त पदे यांचे वर्षनिहाय तपशील खाली दिले आहेत:

 

Year

Employers registered on the NCS Portal

Vacancies Mobilised on the NCS Portal

2020-2021

78,367

12,61,066

2021-2022

52,863

13,46,765

2022-2023

8,19,827

34,81,944

केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1989366) Visitor Counter : 66


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi