राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती निलयम येथे विविध पर्यटक आकर्षणांचे केले उद्घाटन

Posted On: 21 DEC 2023 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 डिसेंबर 2023) राष्ट्रपती निलयम येथे विविध  पर्यटक  आकर्षणांचे  उद्घाटन केले. त्यामध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे:

-   ऐतिहासिक ध्वज स्तंभची प्रतिकृती

- मेझ गार्डन आणि लहान मुलांचे उद्यान

- अनेक पायऱ्या असलेल्या विहिरी आणि पारंपरिक सिंचन प्रणालीचे पुनरुज्जीवन ;

- रॉक वॉटर कॅस्केडवर शिव आणि नंदीची शिल्पे;

आणि

- नॉलेज गॅलरीत नवीन एन्क्लेव्हचा समावेश

सागवान लाकडापासून बनवलेला  36 मीटर (120 फूट) उंच ध्वज स्तंभ हा  1948 मध्ये हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात एकीकरणाचे प्रतीक आहे.

मुख्य इमारतीच्या जवळ असलेल्या मेझ गार्डनमध्ये मुर्राया एक्झोटिका हे मुख्य आकर्षण आहे, तर लहान मुलांसाठी बालोद्यान उभारण्यात आले आहे.

पायऱ्यांच्या तीन विहिरी पुन्हा पूर्ववत केल्यामुळे दरवर्षी पावसाचे मुबलक पाणी साठवले जाईल. यामुळे जलसुरक्षा आणि स्थानिक संसाधनांची शाश्वतता वाढेल, तसेच पारंपरिक सिंचन प्रणालीची  अभ्यागतांना वारशाची ओळख करून देईल.

एका वटवृक्षाखाली दक्षिणेकडे तोंड करून बसलेले दक्षिणामुखी  शिवमूर्ती  आणि खडकावरील नंदी बैल हे पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण असेल.

नॉलेज गॅलरी म्हणजेच ज्ञान दीर्घां मध्ये दोन नवीन दालने  जोडण्यात आली  आहेत - एक हैदराबादच्या एकीकरणाबद्दल आणि दुसरा राष्ट्रपती भवन आणि भारताच्या राष्ट्रपतींबद्दल माहिती देणारी ही दालने आहेत.

नॉलेज गॅलरीच्या बाहेरील रॉक पेंटिंग्ज "एक भारत, श्रेष्ठ भारत" चे विविध पैलू दर्शवतात - वैज्ञानिक आणि संरक्षण कामगिरी, वारसा, विविध स्मारके आणि कला प्रकार यांचे दर्शन इथे घडते.

राष्ट्रपतींच्या दक्षिणेतील दौऱ्यातील मुक्काम  वगळता राष्ट्रपती निलयम हे वर्षभर सर्वसामान्यांसाठी खुले असते. अभ्यागत http://visit.rashtrapati bhavan.gov.in वर त्यांचे स्लॉट ऑनलाइन बुक करू शकतात. लोक निलयमला आठवड्यातून सहा दिवस (सोमवार आणि सरकारी सुटी वगळता) सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत भेट देऊ शकतात, संध्याकाळी 4 वाजता शेवटचा प्रवेश दिला जातो.  राष्ट्रपती निलयमच्या स्वागत कक्षात ‘वॉक-इन’  बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1989176) Visitor Counter : 87