युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्स समारोपाची  केली घोषणा


खेलो इंडिया पॅरा गेम्स - मानवी ध्यासाचा आणि चैतन्याचा उत्सव - अनुराग सिंह ठाकूर

हरियाणा राज्य बनले खेलो इंडिया पॅरा गेम्सचे पहिले विजेते

Posted On: 17 DEC 2023 8:43PM by PIB Mumbai

 

मानवी चैतन्य आणि सर्वसमावेशकतेच्या आठवडाभर चाललेल्या उत्सवानंतर पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सची आज सांगता झाली.  173 सुवर्णपदके जिंकण्यासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत, हरियाणाने 40 सुवर्ण, 39 रौप्य आणि 26 कांस्य पदकांसह एकूण 105 पदकांची कमाई करुन अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशाने 25 सुवर्ण 23 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह एकूण 62 पदके जिंकून दुसरे स्थान पटकावले.

"आज, या विशेष कार्यक्रमात  आम्ही केवळ पदकांचाच नव्हे तर या मैदानात झालेल्या सामन्यांना रंग चढवणाऱ्या लवचिक चैतन्याचा सन्मान करतो, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह  ठाकूर क्रीडा स्पर्धेत सहभागींच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना म्हणाले. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 हा आपल्या क्रीडा इतिहासातील एक ऐतिहासिक अध्याय आहे. 'खेलोगे तो खिलोगेअसे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात याची अनुराग सिंह ठाकूर यांनी आठवण करून दिली. या मागील दिवसांनी अविचल मानवी चैतन्याचे  क्षण कोरले, नवीन विक्रम प्रस्थापित केले, नव्या प्रतिभा उदयास आल्या, कधी विक्रम मोडले  तर काही पूर्वग्रह मोडून काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पित केलेला हा नवा भारत आहे.असे ठाकूर यावेळी म्हणाले.

तामिळनाडूचे राजेश टी, हरियाणाचे संदीप डांगी, महाराष्ट्राची तुलिका जाधव, आसामची अश्मिता ही सर्व नावे त्यांच्या अतुलनीय धैर्य आणि दृढनिश्चयासाठी लक्षात राहतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिष्ठित खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1450 हून अधिक पॅरा ॲथलीट सहभागी झाले होते. यामध्ये  सात क्रीडा प्रकारात स्पर्धा झाल्या.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987558) Visitor Counter : 135


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi