राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींकडून ओमानच्या सुलतानांचे आदरातिथ्य


प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यात ओमानची महत्त्वपूर्ण भूमिका भारत जाणतो आणि त्याचे स्वागत करतो: राष्ट्रपती मुर्मू

Posted On: 16 DEC 2023 9:31PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (16 डिसेंबर, 2023) ओमानचे सुलतान महामहिम हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीही दिली.

भारताच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेल्या महामहिमांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ओमान या प्रदेशातील भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार आणि पश्चिम आशिया धोरणाचा कणा म्हणून एक अद्वितीय स्थान आहे. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी ओमानची महत्त्वपूर्ण भूमिका भारत जाणतो आणि त्याचे स्वागत करतो.

भारत आणि ओमानमधील संबंध आता खऱ्या अर्थाने बहुआयामी बनले आहेत हे नमूद करताना राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. व्यापार आणि गुंतवणुकीचे बंध निरंतर दृढ झाले आहेत आणि संस्कृती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट प्रगती झाली आहे. भविष्यकालीन बाबींविषयी भाष्य करताना त्या म्हणाल्या की ओमानचे व्हिजन 2040’ आणि भारताचा सुरू असलेला विकासाचा प्रवास आम्हाला धोरणात्मक क्षेत्रात व्यापकपणे सहकार्य करण्यासाठी योग्य पार्श्वभूमी निर्माण करतो.

भारताच्या अध्यक्षतेखाली या वर्षीच्या जी 20 शिखर परिषद आणि इतर संबंधित बैठकांमध्ये ओमानच्या बहुमोल सहभागाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.

राष्ट्रपतींनी ओमानच्या विकासात तेथील भारतीय समुदायाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचीही दखल घेतली आणि भारत-ओमान संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

भारत-ओमान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी, प्रादेशिक स्थैर्याला चालना देण्यासाठी आणि सहकार्य आणि प्रगतीच्या नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी ही भेट एक भक्कम पाया म्हणून काम करेल यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987324) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi