मंत्रिमंडळ
औद्योगिक संपदा अधिकारांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी, भारत आणि इटली यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
15 DEC 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि इटलीच्या उद्योग आणि मेड इन इटली मंत्रालयाच्या अखत्यारीतील, औद्योगिक संपदा-इटालियन पेटंट आणि ट्रेडमार्क संरक्षण विषयक महासंचालनालय यांच्यादरम्यान, औद्योगिक संपदा अधिकार क्षेत्रात सहकार्यविषयक सामंजस्य करार करण्यास मंजुरी देण्यात आली.
लाभ:
हा सामंजस्य करार, दोन्ही सहभागी देशांमध्ये अशी यंत्रणा स्थापन करण्यास उपयुक्त ठरेल, ज्यायोगे, आयपी आणि माहिती तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सहकार्य वाढण्यास मदत होईल.
पार्श्वभूमी :
या सामंजस्य कराराचा उद्देश, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयपीआर प्रणालींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी उद्योगांना, विशेषतः स्टार्ट-अप्स आणि लघु उद्योगांना मदत करणे हा आहे. या करारामुळे, आयपीआर अर्जांच्या प्रक्रियेशी संबंधित कार्यपद्धती सुव्यवस्थित करणे, आयपीविषयक जागरूकता वाढवणे, आयपीआरचे व्यावसायिकरण आणि अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे.
या सामंजस्य करारांतर्गत केल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहभागी संस्थांना, एकट्याने किंवा संयुक्तपणे आयोजित कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन औद्योगिक संपदा अधिकार (आयपीआर) क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती, अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण तसेच प्रसार करण्याची संधी उपलब्ध होईल.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986991)
Visitor Counter : 95
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam