पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 डिसेंबरला विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार
पंतप्रधान पाच राज्यांमध्ये विकसित भारत यात्रेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार
विकसित भारत संकल्प यात्रेतील देशभरातले हजारो लाभार्थी या कार्यक्रमात होणार सहभागी
Posted On:
15 DEC 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या म्हणजेच 16 डिसेंबर 2023 रोजी, दुपारी चार वाजता, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.
याच कार्यक्रमात, पंतप्रधान, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवून त्याची सुरुवात करतील.
देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
सरकारच्या सर्व पथदर्शी योजनांचे लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत निश्चित वेळेत पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रमुख योजनांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली जात आहे.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986980)
Visitor Counter : 165
Read this release in:
Kannada
,
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam