कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे आसियान-भारत भरड धान्य महोत्सवाचे उद्घाटन


कृषी क्षेत्र, हवामान आणि अन्नसुरक्षा यांच्यासंदर्भातील आपल्या दृष्टीकोनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य भरड धान्यांमध्ये आहे - केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा

Posted On: 14 DEC 2023 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज नवी दिल्ली येथे आसियान-भारत भरड धान्य महोत्सवाचे उद्घाटन केले.

या महोत्सवाला उपस्थित असलेल्या भारत,कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस,मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी भरड धान्यांचे उत्पादन तसेच वापर यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने राबवलेली धोरणे तसेच बाजारपेठविषयक अभिनव उपक्रम यांवर अधिक भर दिला.  भरड धान्यांचे शेतकरी, ग्राहक तसेच पर्यावरण यांना असंख्य फायदे होतात आणि ही धान्ये जागतिक अन्न-पोषण सुरक्षेसाठी महत्त्वाचे योगदान देतात, असे ते म्हणाले.  भरड धान्यांच्या वाढीव वापराशी जोडले गेलेले सामाजिक-आर्थिक, पोषणविषयक तसेच हवामान विषयक फायदे ठळकपणे मांडत केंद्रीय मंत्री म्हणाले की हा कार्यक्रम भरड धान्यांची उर्जा,  तसेच शेती व पोषण यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची  अमर्याद क्षमता दर्शवतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचा मोठा उपक्रम आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे त्यांनी सांगितले.  

अन्न सुरक्षा तसेच अधिक उत्तम पोषण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्याचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या उपक्रमामुळे या क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्यासह इतर विस्तारित सेवांमध्ये गुंतवणूक होऊ लागली असून त्यातून या धान्यांची उत्पादकता, गुणवत्ता आणि संबंधित उत्पादन पद्धती यामध्ये वाढ करण्याच्या दिशेने संबंधित भागधारकांना प्रेरणा मिळाली आहे, असे ते म्हणाले. 

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, मार्च 2023 मध्ये आयोजित जागतिक भरड धान्य परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेचे जागतिक भरड धान्य उत्कृष्टता केंद्रात रुपांतर करण्याची केलेली घोषणा म्हणजे भरड धान्यांची लागवड आणि या धान्यांसाठी जागतिक संशोधन सहकार्य आणि नवोन्मेष यांना चालना देण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

  

आयआयएमआरने विविध संस्थांमध्ये 25 बियाणे केंद्रे, 18 केंद्रे उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून इतर कृषी विषयक संस्थांच्या सहयोगाने भरड धान्यांची 200 हून अधिक सुधारित वाणे विकसित केली आहेत. यामुळे वार्षिक बियाणे पर्याय गुणोत्तर 10% पर्यंत वाढवण्याच्या उद्देशासह उत्तम दर्जाच्या बियाणांची अतिरिक्त उपलब्धता सुनिश्चित झाली आहे.

हा महोत्सव 15 डिसेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

Macintosh HD:Users:dalip:Desktop:untitled folder 2:DSC_3362.JPG  

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986418) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu