रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्गांसाठी होणाऱ्या भांडवली खर्चात वाढ झाली असून वर्ष 2013-14 मध्ये हा खर्च 51,000 कोटी होता तर 2022-23 मध्ये तो 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक झाला आहे

Posted On: 14 DEC 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांचा (एनएच) विकास आणि देखभालीची जबाबदारी आहे. वर्ष 2013-14 मध्ये या मंत्रालयासाठी 31,130 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती त्यात वाढ होऊन वर्ष 2023-24 मध्ये या मंत्रालयाला 2,70,435 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गांसाठी होणाऱ्या भांडवली खर्चात वाढ झाली असून वर्ष 2013-14 मध्ये हा खर्च 51,000 कोटी होता तर 2022-23 मध्ये तो 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा चालक घटक असलेले पायाभूत सुविधा क्षेत्र देशाच्या अधिक वेगवान वृद्धी आणि विकासात योगदान देते.

अशा  प्रकारच्या वाढीव अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे देशात मार्च 2014 मध्ये अस्तित्वात असलेले 91,287 किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विस्तारत जाऊन सध्याच्या छत्तीसगड, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि ईशानेकडील राज्यांतील राष्ट्रीय महामार्ग उभारणीसह 1,46,145 किलोमीटर लांबीच्या जाळ्यात परिवर्तीत झाले आहे.

गेल्या नऊ वर्षांमध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे वर्षनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहेत:-

Length in Km

Year

Strengthening etc.

2 Lane

4 Lane

6/8 Lane

Total

2014-15

649

2,750

733

278

4,410

2015-16

802

3,970

1,010

279

6,061

2016-17

1,349

5,060

1,655

167

8,231

2017-18

2,446

4,868

2,199

316

9,829

2018-19

1,719

6,033

2,517

587

10,855

2019-20

862

6,031

2,728

616

10,237

2020-21

4,907

4,408

2,913

1,099

13,327

2021-22

2,790

3,704

2,798

1,165

10,457

2022-23

2,152

3,544

3,294

1,341

10,331

 

मंत्रालयाने या काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले असून किंवा त्यातील काही टप्पे यापूर्वीच पूर्ण झाले आहेत आणि वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली-दौसा -लालसौत विभाग (229 किलोमीटर) आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा मध्य प्रदेशातील संपूर्ण टप्पा (210 किलोमीटर), राजस्थानातील अमृतसर-भटिंडा-जामनगर (470 किलोमीटर), हैदराबाद-विशाखापट्टणम्म मार्गाचा सूर्यपेट-खम्माम टप्पा, इंदोर-हैदराबाद(175 किलोमीटर), आसाम मधील तेजपूर जवळील एनएच-37 ए (जुना)वरील नवीन ब्रह्मपुत्रा पूल, मिझोराम येथील कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट  वाहतूक प्रकल्प, मेघालयातील एनएच-44 ई आणि एनएच 127बी चा शिलॉंग-तुरा टप्पा यांचा समावेश आहे.

तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हाती घेतलेल्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा वडोदरा -मुंबई विभाग, बेंगळूरू-चेन्नई द्रुतगती महामार्ग, बेंगळूरू रिंग रोड, रायपुर-विशाखापट्टणम आर्थिक मार्गिका, उत्तराखंडातील चार धाम प्रकल्प, अरुणाचल प्रदेशातील ट्रान्स अरुणाचल महामार्ग (एनएच-13, एनएच15 आणि एनएच 215), मणिपूर येथील इम्फाळ-मोरेह महामार्ग, दिमापुर-कोहिमा टप्पा या प्रकल्पांचे काम देखील प्रगतीपथावर आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986403) Visitor Counter : 88