युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडा विज्ञान परिसंवादात पॅरा क्रीडापटूंविषयीच्या वचनबद्धतेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला पुनरुच्चार


अनेक नामवंत वक्ते या परिसंवादात महत्त्वाच्या विषयांवरील पॅनेल चर्चा आणि व्याख्यानांमध्ये झाले सहभागी

Posted On: 13 DEC 2023 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2023

 

क्रीडा क्षेत्रातील समावेशकता आणि प्रगतीविषयीच्या वचनबद्धतेचे अतिशय दिमाखदार दर्शन घडवणारा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला क्रीडा विज्ञान परिसंवाद खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांच्या यशस्वितेसाठी धोरणांची आखणी करणारा आणि चर्चा घडवून आणणारा एक मध्यवर्ती मंच म्हणून उदयाला आला. खेलो इंडियाच्या सहकार्याने राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्राने या परिसंवादाचे आयोजन केले होते. या महत्त्वाच्या उपक्रमात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर सर्वात अग्रणी आहेत.

इंदिरा गांधी स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या या क्रीडा विज्ञान परिसंवादाच्या पहिल्या दिवशी  क्रीडाक्षेत्रातील भारताच्या उदयाचे परिदृश्य, पारंपरिक सीमारेषांपलीकडे जात  दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा उपक्रमांवर अधिक जास्त प्रमाणात भर देण्यात आला. पॅरा खेळाडूंसाठी समावेशकता आणि समान संधींचा ठाकूर यांनी पुरस्कार केला.

‘अमर्यादित क्षितिजे’ ही या परिसंवादाची संकल्पना असून तिच्यामधून आकांक्षांचे उड्डाण या भावनेचा सूर उमटत आहे. दिव्यांग आणि पॅरा खेळाडूंसाठी क्रीडा विज्ञानावर चर्चा घडवून आणणारा आणि त्याचा सखोल विचार करणारा हा मंच आहे आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये तो पुढे घेऊन जाईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.  

यावेळी भारताच्या पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक, पॅरा धावपटू अंकुर धामा, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल यांच्यासारखे मान्यवर क्रीडा विज्ञान परिसंवादाच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते.  

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane



(Release ID: 1986078) Visitor Counter : 52