माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचा नवी दिल्ली येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात सहभाग
Posted On:
12 DEC 2023 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री, मीनाक्षी लेखी, विकसित भारत संकल्प यात्रेचा भाग म्हणून, नैऋत्य दिल्लीतील आर.के. पुरम येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाल्या. या समारंभात त्यांनी विकसित भारताच्या प्रतिज्ञेचे नेतृत्व केले आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, या काळात कोणतीही व्यक्ती, विशेषत: आर्थिकदृष्ट्या वंचित घटक साधन संपत्ती, अथवा आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही, याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे.
विकसित भारत अभियानाचा भाग म्हणून, लेखी यांनी लोकांना प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY), आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, यासारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आपल्या भेटीदरम्यान, लेखी यांनी, पीएम स्वानिधी शिबिरे, आरोग्य शिबिरे, आयुष्मान कार्ड शिबिरे, आधार अद्ययावतीकरण शिबिरे आणि बँक खाते उघडणे, यासारख्या विविध सेवांच्या प्रत्यक्ष वितरणाचा आढावा घेतला. लोकांचा सक्रिय सहभाग, विशेषतः राजधानी दिल्लीमधील महिलांचा सहभाग, विकसित भारत संकल्प योजनेला मिळत असलेला उत्साहपूर्ण पाठींबा अधोरेखित करत असल्यचे मंत्री मीनाक्षी लेखी यावेळी म्हणाल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा, आपल्या प्रवासादरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित असून, अधिक सूज्ञ आणि सशक्त समाज निर्माण करण्याच्या आपल्या ध्येयामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नाही.
केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक देशाच्या निर्मितीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करत, अशा प्रभावशाली प्रयत्नांना आपले पाठबळ राहील, याचा पुनरुच्चार केला.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1985605)
Visitor Counter : 106