रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पासून निर्मित एन 2 आणि एन 3 श्रेणीच्या मोटर वाहनांच्या केबिन्समध्ये वातानुकूलन यंत्रणा स्थापित करणे बंधनकारक करण्यासाठी अधिसूचना जारी
Posted On:
11 DEC 2023 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023
दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पासून निर्मित एन 2 आणि एन 3 श्रेणीच्या मोटर वाहनांच्या केबिन्समध्ये वातानुकूलन यंत्रणा स्थापित करणे बंधनकारक करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे.
वातानुकूलन यंत्रणेसह स्थापित केबिनची चाचणी, वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या IS 14618: 2022,नुसार होईल.
अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबर, 2025 रोजी किंवा नंतर एन 2 आणि एन 3 श्रेणीचे कोणतेही ड्राइव-अवे चेसिस (अपूर्ण स्वरूपातील इंजिन क्षमता 25 सीसी असलेले वाहन ) स्वरूपात उत्पादित केलेल्या वाहनात, उत्पादक IS 14618:2022 नुसार वातानुकूलन प्रणालीचा मंजूर संचाचा प्रकार पुरवेल
मंत्रालयाने 10 जुलै 2023 रोजी मसुदा अधिसूचना जारी करून संबंधितांकडून सूचना मागवल्या होत्या.
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1985101)
Visitor Counter : 101