संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 75 वर्षानिमित्त गोवा ते कोची आणि कोची ते गोवा या महासागर नौकानयन मोहिमेचा पहिला टप्पा संपन्न
Posted On:
10 DEC 2023 8:54PM by PIB Mumbai
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 75 वर्ष पूर्तीच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून 10 डिसेंबर 2023 रोजी गोवा ते कोची आणि कोची ते गोवा परत असा सागरी मोहिमेचा पहिला टप्पा आज 10 डिसेंबर 2023 रोजी कोची येथे पार पडला. नऊ कॅडेट्स आणि तीन अधिकाऱ्यांच्या ताफ्याने या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात 334 नॉटिकल मैलांहून अधिक अंतर असलेल्या खुल्या महासागरात नौकानयन करण्याचे हे आव्हानात्मक आणि साहसी कार्य पूर्ण केले. म्हादेई, बुलबुल आणि नीलकांत या भारतीय नौदलाच्या नौकांमधून चालक दलाने ही धाडसी नौदल मोहीम पार पाडली. त्यांनी कोची येथे नौकानयनाचे मूलभूत प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर गोवा येथे नौकानयन, नेव्हिगेशन, प्रथमोपचार आणि इतर आवश्यक कौशल्ये यासारख्या पैलूंवर प्रगत प्रशिक्षण घेतले. गोवा ते कोची या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला 6 डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मोहिमेचा दुसरा टप्पा 12 डिसेंबर रोजी कोची बंदरातून सुरू होईल आणि 16 डिसेंबर 23 रोजी गोव्यात संपेल. महासागरात नौकानयन हा सर्वात जास्त मागणी असलेल्या क्रीडा प्रकारांपैकी एक आहे. जे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप आव्हानात्मक मानले जाते. साहसाची भावना निर्माण करणे, जोखीम घेण्याची क्षमता वाढवणे आणि कॅडेट्समध्ये लवचिकता, सांघिक कार्य आणि सतत शिकण्याची आवड विकसित करणे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे उद्दिष्ट आहे. 16 जानेवारी 2024 रोजी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी देशाच्या सेवेत 75 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984824)
Visitor Counter : 115