संरक्षण मंत्रालय
मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या नुकसानाचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला हवाई आढावा
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2023 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
तामिळनाडू इथं, चेन्नई शहर आणि आसपासच्या परिसरात, मिंचौंग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आज म्हणजेच 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आढावा घेतला. तामिळनाडूचे अर्थ आणि मनुष्यबळ विकास मंत्री थंगम थेनारासू आणि मुख्य सचिव शिव दास मीना हेही हवाई सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यासोबतही बैठक घेत सद्यस्थितीचा आढावा घेतला.
हवाई सर्वेक्षणानंतर संरक्षणमंत्र्यानी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या संकटाची तीव्रता, कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करत आहेत. भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर केंद्रीय यंत्रणा, राज्य सरकारला मदत आणि बचाव कार्यात मदत करत असून, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
चक्रीवादळामुळे झालेल्या मनुष्यहानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत व्यथित झाले असून ते ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. “पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी- SDRF चा केंद्र सरकारकडून देय असलेला वाटा, म्हणून आंध्रप्रदेशसाठी 493.60 कोटी रुपये तर तामिळनाडूसाठी 450 कोटी रुपये एवढा निधी अग्रिम स्वरूपात जारी करावा, असे निर्देश, पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाला दिले आहेत. या रकमेचा दोन्ही राज्यांसाठीचा पहिला हप्ता केंद्राने आधीच जारी केला आहे,” असेही सिंह यांनी सांगितले.
केंद्र सरकारने पहिल्या नागरी पूर नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, असं राजनाथ सिंह पुढे म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत ‘चेन्नई खोरे प्रकल्पासाठी एकात्मिक शहरी पूर व्यवस्थापन उपक्रम’ यासाठी 561.29 कोटी खर्चाला मान्यताही दिली आहे. यात केंद्र सरकार चा 500 कोटी रुपयांचा वाटा आहे.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1983701)
आगंतुक पटल : 105