संरक्षण मंत्रालय
माजी सैनिकांना शिष्यवृत्ती देण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसशी (आयएसबी) संरक्षण मंत्रालयाचे सहकार्य
आयएसबी च्या पदव्युत्तर आणि प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शिक्षण शुल्क माफ
Posted On:
07 DEC 2023 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
सशस्त्र दल ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने संरक्षण मंत्रालयाच्या (एम.ओ.डी.) माजी सैनिक कल्याण विभागाने निवृत्तीनंतर नागरी जीवनात परतणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी.) बरोबर सहकार्य करार केला आहे. या सहकार्या अंतर्गत, आयएसबी आपल्या पदव्युत्तर आणि प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमांमधील कर्मचाऱ्यांना 50 टक्के शिक्षण शुल्क माफ करेल, ती वर्षाला एकूण 2.3 कोटी रुपये असेल. याचा लाभ प्रत्येक शैक्षणिक वर्षात 22 माजी सैनिकांना मिळेल.सशस्त्र दलातील कर्मचारी आणि माजी सैनिकांकडे आधीपासून असलेल्या बहुपेडी कौशल्यांना अद्ययावत आणि सखोल व्यवस्थापन कौशल्ये प्रदान करणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे.
संरक्षण मंत्रालयाशी सहकार्य केल्याबद्दल सचिव (माजी सैनिक कल्याण विभाग) विजय कुमार सिंग यांनी आयएसबी चे मनापासून आभार मानले आहेत. "सशस्त्र दलाचे बहुतांश कर्मचारी कमी वयात निवृत्त होतात. ते अत्यंत शिस्तबद्ध असतात, देशसेवेसाठी उत्साह आणि जोमाने भारलेले असतात. हा उपक्रम आपल्या माजी सैनिकांना आणि लवकरच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयएसबी मध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यात नेतृत्वाची भूमिका बजावण्याची एक मौल्यवान संधी प्रदान करेल ", असे ते म्हणाले.
या सहकार्याबद्दल आणि राष्ट्र उभारणीसाठी आणखी योगदान देण्याच्या संधीबद्दल आनंद व्यक्त करताना, आयएसबीचे अधिष्ठाता, प्राध्यापक मदन पिल्लुतला म्हणाले की, अखंड वचनबद्धता आणि अतुलनीय शौर्याने देशाचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलाच्या जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, 50 टक्के शिक्षण शुल्क माफी हा एक मार्ग आहे. "सैनिकांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि बांधिलकी निर्माण होते- हे असे गुण आहेत जे कोणत्याही महत्त्वाच्या भूमिकेतील प्रतिभेचा आधार असतात. राष्ट्रसेवेसाठी समर्पित असलेल्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण अधिक सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे ", असे ते म्हणाले.
आयएसबी च्या माजी विद्यार्थ्यांमध्ये 100 हून अधिक मान्यवर आहेत. ते वर्गात लक्षणीय मूल्य आणतात आणि माजी विद्यार्थ्यांचे जाळे मजबूत करतात.
N.Meshram/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983465)
Visitor Counter : 99