अणुऊर्जा विभाग
स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे
Posted On:
06 DEC 2023 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे अशी माहिती आज लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अवकाश या विभागांचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिली.अणुउर्जा हा उर्जा निर्मितीसाठी सर्वात आश्वासक स्वच्छ उर्जा पर्याय आहे असे ते म्हणाले.
येत्या काही वर्षात जीवाश्म इंधनावरीर अवलंबीत्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर दिला जात आहे.
कमी क्षमतेचे अणुउर्जा प्रकल्प ज्यांना सार्वत्रिकपणे लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) म्हणतात. त्यांच्या लघु आकार आणि मोठ्या प्रमाणातील कार्यक्षमता तसेच कमी कार्बन पदचिन्हे तसेच सुधारित सुरक्षितता या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे या अणुभट्ट्या कार्यनिवृत्त होत असलेल्या कोळशावर आधारित औष्णिक उर्जा उत्पादन केंद्राच्या जागांचा पुनरुपयोग करण्यासाठीचा आकर्षक पर्याय ठरतात. देशभरात सर्वत्र, विशेषतः मोठ्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी सोयीस्कर नसलेल्या ठिकाणी लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) उभारल्यास, त्यांतून कमी कार्बन उत्सर्जनासह मोठ्या प्रमाणात विद्युतनिर्मिती करता येऊ शकेल. जीवाश्म इंधन वापर टाळण्याच्या दृष्टीने, जुन्या झालेल्या जीवाश्मइंधन आधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांचा पुनरुपयोग करण्यासाठी देखील एसएमआर्सची उभारणी तसेच कार्यान्वयन करता येऊ शकेल.
अर्थात, एसएमआर्स हे मोठ्या आकाराच्या अणुउर्जा आधारित पारंपरिक विद्युतनिर्मिती प्रकल्पांना पर्याय ठरू शकत नाहीत कारण हे मोठे प्रकल्प पायाभूत पातळीवर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करतात.
प्रत्येक परिस्थितीत किरणोसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि जनतेला त्या किरणांचा संपर्क होणे टाळण्यासाठी घालून दिलेल्या कठोर नियामकीय अटींनुसारच अणुउर्जा प्रकल्प उभारले आणि परिचालित केले जातात. एसएमआर्सचा तांत्रिक-व्यावसायिक दृष्टीकोन जगातील पातळीवर देखील अजून प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्यांची मोठ्या प्रमाणातील अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेतर्फे (आयएईए) जागतिक पातळीवरील नियामकीय सुसंवादीकरणासह, विशेषतः आपत्कालीन नियोजन विभाग आणि सार्वजनिक स्वीकृतीसह विविध घटकांवर अवलंबून आहे.
N.Meshram/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983183)
Visitor Counter : 111