सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

डॉ.आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने उद्या नवी दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिवस आदरभावनेने पाळण्यात येणार

Posted On: 05 DEC 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023

 


सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या वतीने डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडून (डीएएफ) 6 डिसेंबर 2023 रोजी 68वा महापरिनिर्वाण दिवस संसद भवनाच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाळण्यात येणार आहे. 68व्या महापरिनिर्वाण दिवस स्मृती कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर अनेक मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण करून होईल.

त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला संसद भवनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाजवळ अभिवादन करता यावे यासाठी खुला केला जाणार आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या वतीने डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडून दरवर्षी डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस पाळला जातो.

भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि उपेक्षित समुदायांना विशेषतः अनुसूचित जाती/इतर मागास वर्ग/महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी असामान्य कार्य केले. सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही याविषयीचे त्यांचे विचार आजही  अनेक पिढ्यांना आणि विद्यमान सरकारला प्रेरणा देत असून यापुढेही प्रेरणादायी राहतील, “ सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मंत्रात याचे प्रतिबिंब दिसते आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी डीएएफचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार करत आहेत.

68व्या महापरिनिर्वाण दिवस स्मरण कार्यक्रमात संसद भवनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  पुष्पांजली अर्पण करण्यासाठी हजारो लोक येण्याचा अंदाज आहे. त्याबरोबरच यावेळी बौद्ध भिक्खूंकडून बौद्ध मंत्रोच्चार करण्यात येतील. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत आणि नाट्य विभागाकडून बाबासाहेबांना समर्पित असलेली गीते सादर केली जातील. डॉ. आंबेडकर फाऊंडेशन आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

डॉ. आंबेडकर फाऊंडेशन आणि डॉ, आंबेडकर राष्ट्रीय स्मारक(डीएएनएम) विषयी संक्षिप्त माहिती

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1982692) Visitor Counter : 85