गृह मंत्रालय
केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद इथे ‘माती कला महोत्सवा’ला केले संबोधित
खादीच्या संकल्पनेला पुनर्जीवित करून सामान्य माणसापर्यंत नेत
पंतप्रधानांनी खादीची लोकप्रियता वाढवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बनला आहे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
Posted On:
02 DEC 2023 8:06PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुजरातेतील अहमदाबाद इथे आज ‘माती कला महोत्सवा’ला संबोधित केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भानुप्रताप सिंह वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की माती कला महोत्सव ही बहुआयामी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे घेऊन चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीच्या संकल्पनेला पुनर्जीवित तर केलेच पण त्याबरोबर खादीची संकल्पना सामान्य माणसापर्यंत नेऊन लोकप्रिय करण्यासाठी काम केले.
केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी आणि रोजगार यांना जोडण्याचे काम ‘वोकल फॉर लोकल’ च्या आवाहनामार्फत केले. मृतप्राय होऊ लागलेली खादीची चळवळ त्यांच्या दृष्टीमुळे आज नव्या आयामांना स्पर्श करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे.तिपटीने वाढलेला खादीचा वाढता व्यवहार कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. हे लोक जेव्हा स्वावलंबी होतील तेव्हा जीडीपीच्या वाढत्या आकड्याला माणुसकीच्या दृष्टीकोनातून अर्थ येईल. त्यातून कोट्यवधि लोकांच्या जीवनात विश्वास, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण होईल. आजच्या खादी माती कला महोत्सवात कुंभारकामाची 300 विद्युत चाके, कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया केलेल्या खाद्यान्न उद्योगासाठी 40 टूल किट्स, महिलांना 40 उदबत्ती निर्माण यंत्रे, 20 प्लंबिंग किट्स आणि 200 पेक्षा जास्त पारंपरिक चरख्यांचे वाटप केल्याचे शाह म्हणाले.
खादीच्या उत्पादनासाठी अत्यंत महतत्त्वाच्या सीएसपी अर्थात सेंट्रल सिल्वर प्लांटचे आज उद्घाटन झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
खादी ग्रामोद्योगमधून दरवर्षी प्रत्येक कुटुंबाने 5000 रुपये किमतीची खादी वा उत्पादने विकत घ्यावीत, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्र्यांनी गुजरातसह देशातील जनतेला केले. प्रत्येक कुटुंबाने असे केल्यास देशातील बेरोजगारांच्या संख्येत निम्म्याहून जास्त घट होईल, असे ते म्हणाले.
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982015)
Visitor Counter : 110