वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अर्थव्यवस्थेला सक्षम बनवणाऱ्या पायाभूत सुविधांवर भारताचा भर:  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल


नवोन्मेष, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांच्या विकासात लवचिक कर्ज भांडवल बाजाराची भूमिका महत्त्वाची- तिसऱ्या भारत कर्ज भांडवली बाजार शिखर परिषद 2023 मध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

भारताची अर्थव्यवस्था 7.6 टक्के वेगाने वाढ नोंदवत असून जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने वाढ नोंदवणारा भारत हा जगातील सर्वात वेगवान देश ठरला आहे- पीयूष गोयल

Posted On: 01 DEC 2023 12:31PM by PIB Mumbai

 

पायाभूत सुविधांच्या विकासावर भारताने केंद्रित केलेले लक्ष हे भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक सशक्त बनवत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल केले.  ते ' तिसऱ्या भारत कर्ज भांडवली बाजार शिखर परिषद 2023 - ऑनवर्ड्स अँड अपवर्ड्सच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या विकासात सरकार आणि खाजगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक देशाच्या पायाभूत क्षमतांना चालना देत आहे. ते म्हणाले की, गुंतवणुकीसाठी जी क्षेत्रे अधिक सुरक्षित वाटत आहेत तीच क्षेत्रे वित्तपुरवठा करणाऱ्या व्यावसायिक स्रोतांना अधिक आकर्षित करत आहेत. ते म्हणाले की, शेअर बाजाराने देखील प्रथमच 4 ट्रिलियनचा टप्पा गाठला आहे आणि गुंतवणुकीच्या सर्वाधिक संधी असलेल्या पहिल्या पाच जागतिक बाजारपेठांमध्ये आता भारताची गणना होत आहे.  भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि या तिमाहीत 7.6% वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असेही त्यांनी नमूद केले. संपूर्ण जगाचा आज भारतावर विश्वास आहे,” असे सांगत गोयल म्हणाले की, जिथे जनता लोकशाहीचा आदर करते आणि कायद्यांवर विश्वास ठेवते अशी प्रभावी लोकशाही असल्यामुळे जगाचा विश्वासू भागीदार म्हणून आपला देश अतिशय उज्ज्वल भविष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

गोयल म्हणाले की, अमृत काळात आपण विकसित भारताचे स्वप्न पाहतो आहोत जिथे आपण विकसित आणि समृद्ध भारताच्या दिशेने प्रवास करत आहोत. ते म्हणाले की भारत 2047 पर्यंत आपल्या 3.7 ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेत आणखी $30 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची भर घालेल.

एक तरल कर्ज भांडवल बाजार नवोन्मेष, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांच्या  विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असेही पीयूष गोयल यावेळी म्हणाले. पुढील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणार आहे, येथील टियर 2 शहरे देखील महानगरे बनणार आहेत. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढत आहे, त्यामुळे देशभरात खर्च करण्याची कुवत वाढत आहे. एआय, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक वाहने यांसारखी भविष्यवादी क्षेत्रे आपले भविष्य घडवतील. हरित आणि शाश्वत ऊर्जा हे आपले उद्दिष्ट असून कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या अर्थव्यवस्थेत आपल्या आवश्यक ऊर्जा निर्मितीमध्ये भांडवली बाजार आणि कर्ज बाजार आपली भूमिका बजावत आहेत असेही पीयूष गोयल यांनी यावेळी नमूद केले. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी कॉर्पोरेट जगताला गमवण्याची भीती न बाळगता भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

मंत्री म्हणाले की, वर्ष 2010 ते 2013 दरम्यान, देशात कमकुवत मॅक्रो-इकॉनॉमिक फंडामेंटल होते, परकीय चलन संकट आणि एफसीएनआर (FCNR) रोखे 2013 मध्ये परकीय चलन कर्जावर लक्षणीय उच्च व्याज दर देऊन वाढविण्यात आले होते, चलनवाढ 10% ते 12% च्या उच्च पातळीवर गेली होती.  बँकेची कर्जे चक्रवाढ पद्धतीने वाढत होती, वित्तीय तूट जास्त होती. त्यानंतर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला होता. ते म्हणाले की, व्यवसाय करणे सुलभ करणे आणि अनुपालनाचे ओझे कमी करणे, अनेक गुन्हेगारी कायदे सुलभ करणे, कायद्याच्या पुस्तकातून काही अनावश्यक कायदे काढून टाकणे यावर पंतप्रधानांनी विशेष लक्ष दिले आहे. "ही एक सर्वसमावेशक योजना होती, ज्यामुळे भारताला गेल्या 10 वर्षात परकीय चलनाचा साठा दुप्पट करण्यास मदत झाली," ते पुढे म्हणाले की, आता आपला देश अशा स्थितीत उभा आहे, जिथे  आपण खात्री बाळगू शकतो की पुढील अनेक वर्षे हा देश यशस्वी होणार आहे, जिथे 2013 मध्ये दिसलेल्या प्रकारचे संकट असणार नाही.

पीयूष गोयल म्हणाले की, भारताने वस्तू आणि सेवांची निर्यात जवळपास 55% वाढवलेली आहे, जी वर्ष 2021 मध्ये  500 अब्ज होती ज्यामध्ये गेल्या वर्षी 776 अब्ज पर्यंत वाढ झाली आहे. ते म्हणाले की, जगात दोन संघर्ष सुरू आहेत त्यामुळे विकसित अर्थव्यवस्थांमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. तरीही, चालू आर्थिक वर्षातही निर्यातीच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1981596) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu