राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडला भारताच्या राष्ट्रपतींची सन्माननीय उपस्थिती
Posted On:
30 NOV 2023 12:22PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू आज (30 नोव्हेंबर 2023) खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे पंचेचाळीसाव्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडला उपस्थित राहिल्या. पाचव्या बटालियनच्या इमारतीच्या आगामी बांधकामाची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीए हा नेतृत्वाचा पाया आहे; ज्यातून महान योद्धे तयार झाले आहेत.देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये या अकादमीचे विशेष स्थान आहे आणि सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ही प्रशिक्षण संस्था ओळखली जाते. एनडीएकडून मिळालेले प्रशिक्षण आणि जीवनमूल्ये उत्तीर्ण उमेदवारांना (कॅडेट्स) आयुष्यात प्रगती करण्यास सहाय्य करतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी कॅडेट्सना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करून अग्रेसर रहाण्याचे आवाहन केले.सशस्त्र सेवेतील मूल्यांचे अनुसरण करून ते प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि शौर्याने सामोरे जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
एनडीएच्या पासिंग आऊट परेडमध्ये संचलन करणार्या दलाच्या रूपात प्रथमच महिला कॅडेट्सचा सहभाग पाहून राष्ट्रपतींना आनंद व्यक्त केला.हा दिवस खर्या अर्थाने ऐतिहासिक असल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात सर्व महिला कॅडेट्स देश आणि एनडीएला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारताच्या सीमांचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.आम्ही 'वसुधैव कुटुंबकम्' या परंपरेचे पालन करतो, परंतु, देशाच्या एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि सदैव तयार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981106)
Visitor Counter : 135