संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदीय कामकाज मंत्र्यांनी  2 डिसेंबर रोजी बोलावली  संसदेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक


संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार 

Posted On: 30 NOV 2023 12:14PM by PIB Mumbai

 

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी , संसदीय कामकाज मंत्री  प्रल्हाद जोशी  यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय गटनेत्यांची  बैठक बोलावली आहे.  2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतली संसदेच्या ग्रंथालय भवन इथे ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे आणि शासकीय कामकाजाच्या अत्यावश्यकतेनुसार हे सत्र 22 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. 19 दिवसांच्या कालावधीत एकूण 15 बैठका होतील.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1981103) Visitor Counter : 261