पंतप्रधान कार्यालय
आमच्या देशात गुंतवणूक करण्यासाठी आम्ही जगातील सर्व देशांचे स्वागत करतो. भारत तुम्हाला निराश करणार नाही: पंतप्रधान
Posted On:
26 NOV 2023 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023
गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून भारताबाबत उद्योजकांमध्ये असलेल्या आशावादाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली.
लेखक आणि उद्योजक बालाजी एस यांनी X वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की भारत ही एक प्राचीन संस्कृती आहे त्याचबरोबर ती स्टार्टअप देशासारखी देखील आहे. भारताच्या क्षमतेचा देखील त्यांनी उल्लेख केला .
त्याला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी पोस्ट केले-
"मला तुमचा आशावाद आवडला आणि मी त्यात आणखी नमूद करेन - जेव्हा नवोन्मेषाचा विषय निघतो , त्यात भारतीय नव-नवे पायंडे घालणारे आणि मार्गदर्शक आहेत.
आमच्या देशात गुंतवणूक करण्यासाठी आम्ही जगातील सर्व देशांचे स्वागत करतो. भारत तुम्हाला निराश करणार नाही.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1980062)
Visitor Counter : 102
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam