वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय काजू दिना निमित्त कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ विकास प्राधिकरणाने (अपेडा) बांगलादेश, कतार, मलेशिया आणि यूएसए या देशांबरोबरच्या काजू निर्यातीला केले सहाय्य
Posted On:
24 NOV 2023 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ विकास प्राधिकरण (APEDA), या भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालया अंतर्गत असलेल्या संस्थेने, निर्यात सहाय्यक म्हणून महत्वाची भूमिका बजावली असून, 23 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय काजू दिना निमित्त बांगलादेश, कतार, मलेशिया आणि यूएसए या देशांबरोबर काजूची निर्यात सुरु केली. बांगलादेशला ओदिशा येथून काजूची पहिली खेप मिळणार आहे.
भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा काजू उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. जगाच्या काजू निर्यातीत भारताचा 15 टक्के पेक्षा जास्त वाटा असून, त्यानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो. युएई, नेदरलँड्स, जपान आणि सौदी अरेबिया ही भारताची प्रमुख काजू निर्यातीची ठिकाणे आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओदिशा, कर्नाटक आणि तामिळनाडू ही भारतातील प्रमुख काजू उत्पादक राज्ये आहेत.
काजू आणि त्यापासून बनलेली उत्पादने अपेडाच्या (APEDA) कक्षेत आल्यापासून, ही संस्था या उद्योगासमोरील, आधुनिकीकरण आणि प्रक्रिया सुविधा, लॉजिस्टिक, गुणवत्ता आणि तीव्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा या स्वरूपाच्या विविध समस्या आणि आव्हानांची हाताळणी करण्यासाठी काजू उत्पादन क्षेत्राच्या भागधारकांशी संवाद साधत आहे.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979558)
Visitor Counter : 124