माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

54 व्या इफ्फीमध्ये ‘विदुथलाई भाग-1’ च्या कलाकार आणि चमूने माध्यमांशी साधला संवाद


स्थानिक संस्कृती, भाषा आणि भूमीत रुजलेल्या सिने कथांच्या निर्मितीवर भर : वेत्री मारन, दिग्दर्शक

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2023

 

“स्थानिक संस्कृती, भाषा आणि भूमीत रुजलेले आणि त्याच्याशी साधर्म्य साधणारे चित्रपट मी बनवतो” असे तमिळ चित्रपट विदुथलाई भाग-1 चे दिग्दर्शक वेत्री मारन म्हणाले. हा चित्रपट काल 54 व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा फीचर विभागात प्रदर्शित झाला.  दिग्दर्शक, नायक सूरी, निर्माता एलरेड कुमार संथनम आणि छायाचित्रण दिग्दर्शक आर वेलराज यांनी गोव्यात आयोजित 54 व्या इफ्फीमध्ये प्रतिनिधी, चित्रपट रसिक आणि माध्यमांशी संवाद साधला.

चित्रपटाच्या उत्पत्तीबद्दल बोलताना, वेत्री मारन म्हणाले की कोविड काळात जेव्हा निर्बंध घेतले जात होते आणि काढून टाकले जात होते तेव्हा त्यांना  एक लहानसा चित्रपट बनवायचा होता. त्यांना चित्रपटाच्या संपूर्ण चमूसोबत जंगलात जायचे होते जिथे ते उर्वरित जगापासून दूर राहून 30 दिवसात चित्रपट पूर्ण करणार होते. हा चित्रपट 1998 मध्ये जयमोहन यांनी लिहिलेल्या  'थुनाइवन' या 6 पानांच्या लघुकथेवर आधारित आहे, वेत्री मारन यांनी काही भाग लिहिला आणि  थोडे  संशोधन केले.  मात्र जेव्हा त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली, तेव्हा इतर गोष्टी त्यात जोडल्या गेल्या. ते म्हणाले  “हा प्रदीर्घ प्रवास आहे आणि आणखी  एक चित्रपट बनत आहे”.

चित्रपटाचे संगीत इलैयाराजा यांचे आहे आणि त्यांच्याबरोब्र वेत्री मारन यांनी प्रथमच काम केले आहे.

प्रमुख अभिनेत्याची प्रशंसा करताना ते म्हणाले, "सूरी याने कुमारेसनची व्यक्तिरेखा सहजपणे साकारली आहे, त्याचे अस्सल व्यक्तिमत्व भूमिकेत सहजतेने मिसळले आहे." विशेष म्हणजे, शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सूरीने घेतलेली मेहनत चित्रपटाच्या अंतिम दृश्यात स्पष्ट दिसते , जी त्याच्या  समर्पण आणि तंदुरुस्तीचा दाखला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिनेता सूरी यांनी सांगितले की विनोदी कलाकार म्हणून सुमारे 160 चित्रपटांमधील कारकिर्दीनंतर प्रथमच नायक म्हणून एका भव्य मंचावर पाऊल ठेवताना  आनंद होत आहे. सुरुवातीला दुय्यम वाटणारी आणि नंतर प्रमुख ठरलेली भूमिका दिल्याबद्दल वेत्री मारन यांचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला.

छायाचित्रण दिग्दर्शक  आर वेलराज यांनी चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्याचा 8.5 मिनिटांचा सलग भाग चित्रित करताना सामोरे जावे लागलेल्या आव्हानांचा उल्लेख केला.  या दृश्यासाठी 13 दिवस छायाचित्रणाचे जटिल तंत्र आणि विविध कोन वापरून प्रयत्न केले गेले. सत्यमंगलमच्या खडबडीत प्रदेशातील 15 दिवसांच्या चित्रीकरणाची आठवण सांगताना  वेलराज यांनी तिथले अनुभव सांगितले, दररोज आठ किलोमीटरचा ट्रेक , ज्यातून   चित्रीकरणाची जटिलता आणि कमी प्रकाशात केलेले चित्रीकरण अधोरेखित होते.

मार्च 2023 मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट समीक्षक आणि व्यावसायिक पातळीवर यशस्वी ठरला आहे. चित्रपटाचा दुसरा भाग 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट सारांश:

विदुथलाई भाग-1 ची कथा 1987 मध्ये तामिळनाडूमध्ये साकारताना दाखवली आहे. एका रेल्वे पुलावर झालेल्या विनाशकारी बॉम्बस्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला होता, द पीपल्स आर्मी या सशस्त्र सरकारविरोधी गटाने प्रदेशाच्या स्थिरतेला धोका निर्माण केला आहे. त्यांचा म्होरक्या पेरुमल याला पकडण्याची जबाबदारी  विशेष पोलिस बटालियनला देण्यात  आली आहे. नवीन भरती झालेल्या कुमारेसनच्या पोलिसांच्या कामाबद्दलच्या अपेक्षा भंग पावल्या आहेत कारण तो जंगलात दुय्यम कामे करत असतो.  तो थामीझारासीशी मैत्री करतो, तिच्या समाजाच्या दुर्दशेबद्दल जाणून घेतो, वरिष्ठांकडून राग ओढवून घेतो. थामीझारासीच्या गावाला पोलिसांच्या छळापासून वाचवण्यासाठी, कुमारेसन  धोका पत्करून एक योजना आखतो.

 

कलाकार आणि अन्य चमू :

दिग्दर्शक : वेत्री मारन

कलाकार: सूरी, विजय सेतुपती, भवानी श्री

पटकथा लेखक: वेत्री मारन, मणिमारन

निर्माता: आरएस इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ग्रासरूट फिल्म कंपनी

छायाचित्रण दिग्दर्शक : आर. वेलराज

संकलक : आर. रामर

Watch the full interaction here: https://www.youtube.com/watch?v=1qsv_EsbDaU

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

iffi reel

(Release ID: 1978902) Visitor Counter : 111