दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायच्या नावाने होणाऱ्या फसवणूकीपासून सावधान
Posted On:
15 NOV 2023 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2023
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या(ट्राय) असे निदर्शनास आले आहे की काही कंपन्या/ संस्था/ व्यक्ती जनतेला/ ग्राहकांना बनावट दूरध्वनी करून ते ट्रायमधून बोलत आहेत आणि या ग्राहकांच्या क्रमांकांवरून ग्राहकांना नको असलेले संदेश पाठवले जात असल्याने त्यांचे मोबाईल क्रमांक खंडीत करण्यात येतील. तसेच या कंपन्या/ संस्था/ व्यक्तींकडूनअशी देखील माहिती देण्यात येते की ग्राहकांनी सिम कार्ड मिळवण्यासाठी जे आधार क्रमांक दिले होते त्यांचा वापर बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात आहे. या कंपन्या/ संस्था/ व्यक्ती लोकांना/ ग्राहकांना फसवण्यासाठी त्यांना त्यांचे क्रमांक खंडीत होऊ द्यायचे नसतील तर स्काईप व्हिडिओ कॉलवर येण्याचे देखील निमंत्रण देत आहेत.
जनतेला असे कळवण्यात येत आहे की ट्राय कोणत्याही दूरसंचार ग्राहकाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक/ खंडीत करत नाही. ट्राय कधीही मोबाईल क्रमांक खंडीत करण्यासाठी मेसेज किंवा फोन करत नाही. ट्रायने कोणत्याही संस्थेला अशा प्रकारच्या कामांसाठी ग्राहकांसोबत संपर्क करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि अशा प्रकारचे कॉल अवैध आहेत आणि त्यांच्या संदर्भात कायदेशीर उपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे.त्यामुळे ट्रायकडून बोलत असल्याचा दावा करून येणारे कोणतेही फोन किंवा मेसज हे बनावट आणि फसवणुकीसाठी केले असल्याचे लक्षात घेतले पाहिजे.
ट्रायच्या टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (TCCCPR) 2018 नुसार अशा प्रकारचे अवैध संपर्क करण्यामध्ये सहभागी असलेल्या मोबाईल क्रमांकांविरोधात ऍक्सेस सर्विस प्रोव्हायडर योग्य ती कारवाई करण्यासाठी जबाबदार आहेत. पीडीत व्यक्तींना संबंधित सेवा पुरवठादारासोबत त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावरून किंवा https://cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊन किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करून या प्रकरणी तक्रार दाखल करता येईल.
S.Kakade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977253)
Visitor Counter : 148