कृषी मंत्रालय

झारखंडच्या खुंटी येथील बिरसा कॉलेज मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी करतील जारी;


'जनजाती गौरव दिवस' (आदिवासी गौरव दिवस) म्हणून साजरा केला जातो हा दिवस

Posted On: 14 NOV 2023 7:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर 2023 रोजी बिरसा कॉलेज, खुंटी, झारखंड येथे 'जनजाती गौरव दिवस' साजरा करतील आणि प्रधानमंत्री किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी करतील. सांस्कृतिक वारसा जतन आणि राष्ट्रीय अभिमान, शौर्य आणि आदरातिथ्य या भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी आदिवासींच्या प्रयत्नांची नोंद घेण्यासाठी  दरवर्षी हा जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो.  हा कार्यक्रम देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), आयसीएआर  संस्था, राज्य कृषी विद्यापीठे, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे, प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि सामान्य सेवा केंद्रे (CSCs) यांच्या द्वारे प्रसारित केला जाईल.

या योजनेच्या 15 व्या हप्त्यात, 8.0 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना  18,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.15.11.2023 रोजी एका बटणावर क्लिक करून पंतप्रधानांनी हा हप्ता जारी केला. योजनेच्या सुरुवातीपासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम 2.80 लाख कोटींहून अधिक जाण्याची अपेक्षा आहे. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर प्रासंगिक गरजा पूर्ण करण्यात मदत करेल.

प्रधानमंत्री किसान योजनेच्या 15व्या हप्त्याचे वितरण भारत सरकारच्या शेतीला चालना देणे , शेतकर्‍यांचे सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आणि भारतातील शाश्वत कृषी पद्धतींच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी मंत्रालय विविध कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेत आहे.

 

 

 

 

G.Chippalkatti/G.Deoda/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1976964) Visitor Counter : 125