संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री आणि अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची नवी दिल्लीत संरक्षण आणि धोरणात्मक विषयांशी संबंधित अनेक मुद्यांवर द्विपक्षीय बैठकीदरम्यान चर्चा


भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षणविषयक उद्योगातील सहकार्यात वाढ करण्यावर भर

आसाममध्ये सापडलेले दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील विमान, पॅराशूट आणि गणवेशाचे भाग राजनाथ सिंह यांनी अमेरिकन दलांकडे सोपवले

Posted On: 10 NOV 2023 3:26PM by PIB Mumbai

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत 10 नोव्हेंबर 2023 रोजी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. संरक्षण आणि धोरणात्मक विषयांशी संबंधित अनेक मुद्यांवर दोन्ही मंत्र्यांनी सर्वसमावेशक चर्चा केली. संरक्षण उद्योगातील सहकार्य वाढवण्यावर आणि दोन्ही देशांमधील संरक्षण उद्योगांनी एकत्र येण्यावर आणि परस्पर सहकार्याने संरक्षण प्रणालींचा विकास आणि सह-उत्पादन करण्यावर या चर्चेत विशेष भर होता. अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधनाद्वारे आपले संरक्षण तंत्रज्ञानविषयक सहकार्य वाढवण्याचे मार्ग आणि उपायांची या मंत्र्यांनी चाचपणी केली. इंडस-एक्स या यावर्षी जून महिन्यात सुरू केलेल्या

भारत-अमेरिका संरक्षण उद्योग परिसंस्थेच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला आणि धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि दोन्ही सरकारांमधील संरक्षण उद्योग सहकार्याचा, भारत आणि अमेरिकेतील व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांचा विस्तार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

बाहरिनमध्ये बहुस्तरीय मुख्यालय असलेल्या एकत्रित सागरी दलांचे संपूर्ण सदस्यत्व घेण्याच्या भारताच्या निर्णयाचे मंत्री ऑस्टिन यांनी स्वागत केले.

आसाममध्ये सापडलेले काही अवशेष संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांच्याकडे अमेरिकेच्या संरक्षण युद्धकैदी एमआयए अकाऊंटिंग एजन्सी मिशनचा एक भाग म्हणून सुपूर्द केले. 

या अवशेषांमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकेच्या दलातील विमान, पॅराशूट आणि गणवेशाच्या तुकड्यांचा समावेश होता. बैठकीचा समारोप करण्यापूर्वी दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या चमूच्या भावी काळातील एकत्रित कामाचा जाहीरनामा तयार केला.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976181) Visitor Counter : 59