जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जलसंपदा क्षेत्रातील सहकार्याविषयी 6व्या भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन

Posted On: 09 NOV 2023 4:26PM by PIB Mumbai

 

भारताचे जलशक्ती मंत्रालय आणि ऑस्ट्रेलियाचा हवामान बदल, ऊर्जा आणि जल विभाग यांच्यात 8 नोव्हेंबर 2023 रोजी जलसंपदा क्षेत्रातील सहकार्याविषयी 6व्या भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जल क्षेत्रामधील सहकार्यात वाढ करण्याविषयी आणि दोन्ही देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विविध कामांसंदर्भात पुढची दिशा निश्चित करण्याविषयी भारत आणि ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रतिनिधींमध्ये फलदायी चर्चा झाली.

दोन्ही देशांच्या सह-अध्यक्षांनी त्यांच्या उद्घाटन संबोधनात जलक्षेत्रात भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य कार्यक्रमाच्या समृद्ध इतिहासावर भर दिला आणि या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध तांत्रिक आणि धोरणात्मक व्यवहारांमध्ये सक्रीय सहभागाद्वारे सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. जल क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी संस्थात्मक क्षमता उभारणीचे दर्शन घडवणाऱ्या प्रकल्पांची तांत्रिक देवाणघेवाण आणि अंमलबजावणीबाबत आतापर्यंत झालेल्या प्रगतीची दखल घेत, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बाजूंनी त्याबाबत समाधान व्यक्त केले.

मायवेल ऍपचे एनडब्लूआयसी एकात्मिकरण, ऑस्ट्रेलिया-भारत सुरक्षा उपक्रम(AIWASI), इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल प्रोग्राम, वॉटर अकाउंटिंग इन प्रॅक्टिस अँड ऍप्लिकेशन, बेसिन प्लॅनिंग को डिझाईन वर्कशॉप, ऍक्वावॉच ऑस्ट्रेलिया, ग्रामीण भूजल सहकार आणि अंतर्गत क्षारता उपाययोजना यांचा समावेश असलेले सध्या सुरू असलेले विविध उपक्रम(श्रेणी -1) आणि प्रस्तावित असलेले उपक्रम(श्रेणी -2) याविषयीची सादरीकरणे करण्यात आली. त्यानंतर या सादरीकरणाच्या आणि चर्चांच्या आधारावर या दोन्ही श्रेणीमधल्या  उपक्रमांच्या अनुषंगाने 2024-25 साठी भारत-ऑस्ट्रेलिया कार्य आराखडा अंतिम करण्यात आला आणि दोन्ही बाजूंनी त्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली. दोन्ही सह-अध्यक्षांच्या समारोप संबोधनाने या बैठकीचा समारोप झाला.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975984) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi