ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खुला बाजार विक्री (देशांतर्गत ) योजनेअंतर्गत 2316 बोलीदारांना केंद्र सरकारकडून 2.85 एलएमटी गहू आणि 5180 एमटी तांदूळाची विक्री
Posted On:
09 NOV 2023 4:03PM by PIB Mumbai
तांदूळ, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार हस्तक्षेपाच्या भारत सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव घेतले जातात. 20 वा ई-लिलाव 08.11.2023 रोजी घेण्यात आला. ओएमएसएस (डी )अर्थात खुला बाजार विक्री (देशांतर्गत ) योजनेअंतर्गत 3 लाख मेट्रिक टन गहू आणि 2.25 लाख मेट्रिक टन तांदूळ यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि 2.85 लाख मेट्रिक टन गहू आणि 5180 मेट्रिक टन तांदूळ 2316 बोलीदारांना विकण्यात आले.
अखिल भारतीय स्तरावरील प्रति क्विंटल 2150 रुपयांच्या तुलनेत फेअर अॅव्हरेज दर्जाच्या गव्हाची सरासरी विक्री किंमत प्रति क्विंटल 2327.04 रुपये राहिली. तर यूआरएस गव्हासाठी रूपये 2125/क्विटल या राखीव किमतीच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत रुपये 2243.74/क्विटल इतकी राहिली.
या व्यतिरिक्त, खुला बाजार विक्री (देशांतर्गत ) योजने अंतर्गत 2.5 एलएमटी गहू केंद्रीय भंडार/एनसीसीएफ /नाफेड सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हापासून कणिक करण्यासाठी आणि 'भारत आटा' या ब्रँड अंतर्गत लोकांना विकण्यासाठी म्हणून वितरित करण्यात आला आहे. यासाठी एमआरपी 27.50रुपये प्रति किलोपेक्षा अधिक नसावी. दिनांक 07.11.23 पर्यंत या 3 सहकारी संस्थांद्वारे गव्हाचे पीठात रूपांतर करण्यासाठी 6051 मेट्रिक टन गव्हाची उचल करण्यात आली आहे.
खुला बाजार विक्री (देशांतर्गत) योजनेअंतर्गत गहू विक्रीच्या या व्यवस्थेपासून व्यापार्यांना दूर ठेवण्यात आले आहे आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी देशभरात 07.11.23 पर्यंत 1851 यादृच्छिक तपासण्या करण्यात आल्या आहेत.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975981)
Visitor Counter : 126