उपराष्ट्रपती कार्यालय

आणीबाणी लागू केल्याचा काळ आपल्या इतिहासातील सर्वात काळा कालखंड - उपराष्ट्रपती


पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आपल्या जनतेचे  मूलभूत हक्क आणि मानवाधिकार  हिरावून घेऊ शकत नाही- उपराष्ट्रपती

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या  200  व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात  उपराष्ट्रपती झाले सहभागी

Posted On: 09 NOV 2023 5:10PM by PIB Mumbai

 

पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आपल्या जनतेचे  मूलभूत हक्क आणि मानवाधिकार  हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी केले आहे. आणीबाणी लागू करण्यात आली तो काळ आपल्या  "इतिहासातील सर्वात काळा कालखंड " होता असे ते म्हणाले.  या काळापासून प्रत्येकाने बोध घेऊन पुढील वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

गोव्याचे  राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या   "वामन वृक्ष कला" या 200 व्या पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे करताना धनखड  यांनी राज्यपालांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.  "संविधानाचे संरक्षण, जतन आणि बचाव करण्याची" शपथ राज्यपाल घेतात, हे त्यांनी अधोरेखित केले.   देशाच्या जनतेची सेवा करताना प्रत्येकाने संविधानानुसार कार्य केले पाहिजे असे सांगून  राज्यपालांची जबाबदारी उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केली.

लोकांना आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये समाधान आणि शांततेचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक योग्य वेळी प्रकाशित झाले असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. निसर्गाशी जोडण्याकरिता शांत अवकाश हे पुस्तक निर्माण करते, असे ते म्हणले. सर्वसामान्यपणे  बोन्साय हा कलाप्रकार चीन आणि जपानशी संबंधित असल्याचे मानले जाते मात्र भारतातून हा कलाप्रकार उगम पावत  असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. 

नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर होणे, हा इतिहासातील सर्वात गौरवास्पद क्षण असल्याचे वर्णन उपराष्ट्रपतींनी केले. तीन दशकांनंतर हे यश मिळाल्याचे ते म्हणाले. या यशाचे श्रेय उपराष्ट्रपतींनी दूरदर्शी, समर्पित आणि सर्वसहमतीच्या दृष्टिकोनाला दिले.

मानवजातीला  "ग्रहाचे विश्वस्त" म्हणून संबोधतपृथ्वी केवळ मानवांसाठी नाही तर सर्व सजीवांसाठी आहे, प्रत्येकाला ग्रहावर राहण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले.  नैसर्गिक साधनसंपत्तीच्या इष्टतम वापरासाठी संतुलनाच्या  महत्त्वावर त्यांनी भर दिला.  वित्तीय क्षमतेपेक्षा गरजा लक्षात घेऊनच निर्णय घेतले जावेत,   यावर त्यांनी  भर दिला.

स्वच्छ भारत सारख्या उपक्रमांमुळे  देशातील समुद्रकिनाऱ्यांवर होत असलेल्या महत्त्वपूर्ण बदलांची दखल  उपराष्ट्रपतींनी घेतली. स्वच्छ पर्यावरणाकडचा हा कल  "मानवांसाठी आल्हाददायकता  आणि परिसंस्थेप्रति  काळजी व्यक्त करतो, असे ते  म्हणाले. या बदलांमुळे या नैसर्गिक ठिकाणांचे  मूळ सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल, अशी आशा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

यावेळी गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आणि खासदार डॉ. पी टी. उषा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मौजो आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

1699523810632_copy_4320x2880.jpg

1699520005547_copy_4320x2880.jpg

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975968) Visitor Counter : 91