रेल्वे मंत्रालय

आरपीएफने 'नन्हें फरिश्ते' मोहिमेअंतर्गत ऑक्टोबर 2023 मध्ये 601 हून अधिक मुलांची त्यांच्या कुटुंबियांशी घडवली भेट


प्रवाशांची सुखरूपता, सुरक्षितता आणि दिलासा  यासाठी आरपीएफ सदैव कार्यरत

Posted On: 09 NOV 2023 12:41PM by PIB Mumbai

 

रेल्वे मालमत्तेचे, प्रवासी क्षेत्रांचे आणि प्रवाशांच्या हिताचे  संरक्षण  करण्याच्या आपल्या  वचनबद्धतेसाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ ) सदैव कार्यरत आहे. प्रवाशांना सुखरूप, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे दल अविरत  कार्यरत आहे.

आरपीएफने ऑक्टोबर 2023 मध्ये, प्रवाशांची सुखरूपता, सुरक्षितता आणि आरामदायकता यांच्या सुनिश्चितीसोबतच  भारतीय रेल्वेला आपल्या  ग्राहकांना विश्वासार्ह  मालवाहतूक सेवा वितरीत करण्यात साहाय्य केले.

आरपीएफने  प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वे मालमत्तेसंदर्भात  गुन्हा घडल्यावर त्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत  देशभर पसरलेल्या रेल्वेच्या प्रचंड मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे.

ऑक्‍टोबर 2023 महिन्‍यामध्‍ये आरपीएफच्‍या कामगिरीची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे 

'नन्हें फरिश्ते' मोहीम -हरवलेल्या मुलांची सुटका : 'नन्हें फरिश्ते' मोहिमेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 601 हून अधिक मुलांची आपल्या कुटुंबासमवेत भेट घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही मुले विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विलग झाली होती. ती सुरक्षितपणे घरी परतण्याच्या सुनिश्चितीसाठी आरपीएफने निरंतर कार्य केले.

मानवी तस्करीविरोधी प्रयत्न (अभियान 'आहट') :  भारतीय रेल्वेच्या विविध चौक्यांवरील आरपीएफच्या मानवी तस्करीविरोधी एककांनी (AHTUs-आहट) मानवी तस्करांच्या योजना निष्काम करण्यासाठी  अथक प्रयत्न केले. ऑक्टोबर 2023 मध्ये, आरपीएफने  तस्करांच्या तावडीतून 39 व्यक्तींची  सुटका केली.

अभियान 'जीवन रक्षा'- प्राणांचे संरक्षण :  रेल्वेगाडीमुळे खेचले गेलेल्या, तसेच  फलाट  आणि रेल्वे रुळांवर धोका निर्माण झालेल्या 262 प्रवाशांचे प्राणअभियान  'जीवन रक्षा' अंतर्गत आरपीएफच्या सतर्क आणि जलद कृतीमुळे, ऑक्टोबर 2023 मध्ये बचावले.

महिला प्रवाशांचे सक्षमीकरण - "मेरी सहेली" उपक्रम:  महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय आरपीएफ  गांभीर्याने घेत असून त्यासाठी  "मेरी सहेली" उपक्रम सुरू केला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, 232 "मेरी सहेली" पथकांनी  13,664 गाड्यांमध्ये जात  423,803 महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली. आरपीएफने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये आढळलेल्या 5,722 व्यक्तींवर कारवाई केली.

दलालांवर कडक कारवाई ( "उपलब्ध" मोहीम ): दलालांविरुद्धच्या लढाईत, आरपीएफने  ऑक्टोबर 2023 मध्ये 490 व्यक्तींना  अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार वैध  कारवाई केली. शिवाय 42 बेकायदेशीर सॉफ्टवेअरसह 43.96 लाख रुपये  किमतीची तिकिटे जप्त केली. 

मोहीम 'नार्कोज'- अमली पदार्थांसंदर्भातल्या गुन्ह्यांविरोधात लढा : आपल्या स्तुत्य प्रयत्नात आरपीएफने ऑक्टोबर 2023 मध्ये 99 व्यक्तींना अटक केली आणि 5.99 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या गुन्हेगारांना अधिकारप्राप्त संस्थांकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले.

प्रवाशांच्या तक्रारींवर  जलद प्रतिसाद: आरपीएफने रेल्वे मदत (Rail Madad Portal) पोर्टल आणि हेल्पलाइन ( आणीबाणी प्रतिसाद मदत प्रणाली क्र. 112 सह एकत्रित क्र 139) द्वारे  प्रवाशांच्या सुरक्षा-संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण केले. ऑक्टोबर 2023 मध्ये 30,300 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.  त्यांचे निराकरण करण्यासाठी आरपीएफने आवश्यक पावले उचलली.

अभियान 'यात्री सुरक्षा'- प्रवाशांचे संरक्षण : रेल्वे प्रवाशांवरील गुन्हे रोखण्यासाठी आणि त्यांचा छडा लावण्यासाठी  आरपीएफ पोलिसांना साहाय्य करते.  प्रवाशांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये हात  असलेल्या 256 गुन्हेगारांना आरपीएफने ऑक्टोबर 2023 मध्ये अटक केली आणि त्यांना संबंधित जीआरपी /पोलिसांकडे सुपूर्द केले.

'ऑपरेशन संरक्षा' च्या माध्यमातून सुरक्षिततेची सुनिश्चिती : प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे सेवांचे संरक्षण करण्यासाठीच्या दृढनिश्चयी प्रयत्नांमध्ये आरपीएफने, ऑक्टोबर 2023 मध्ये धावत्या गाड्यांवर दगडफेकीच्या धोकादायक कृत्यात हात  असलेल्या 33 व्यक्तींना अटक केली.

गरजूंना मदत करणे (अभियान  सेवा): मानवतावादी दृष्टीकोनातून, आरपीएफने  ऑक्टोबर 2023 मध्ये 272 वृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान मदत दिली.

बेकायदेशीर माल वाहतुकीला आळा घालणे (अभियान सतर्क ):  अभियान सतर्क अंतर्गत आरपीएफने  10,33,149  रुपये किमतीची अवैध तंबाखूजन्य उत्पादने आणि  26,12,656 रुपयांची अवैध दारू जप्त करत  127 व्यक्तींना ताब्यात घेतले.  या व्यक्तींना संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांच्या  ताब्यात देण्यात आले.

***

N.Meshram/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975956) Visitor Counter : 124