विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भूतकाळातील सुशिक्षित बेरोजगारांकडून आपण आता आय-पीएचडीच्या म्हणजे इतर शब्दात विज्ञानातील पीएचडीमधील उद्योग संलग्न असलेल्या शैक्षणिक पदवीच्या प्रारंभाने   सुशिक्षित रोजगार प्रदाते विज्ञानकुशल उद्योजक बनण्याच्या युगात प्रवेश करत आहोत- डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 07 NOV 2023 3:23PM by PIB Mumbai

 

भूतकाळातील सुशिक्षित बेरोजगारांकडून आपण आता आय-पीएचडीच्या म्हणजे इतर शब्दात विज्ञानातील पीएचडीमधील उद्योग संलग्न असलेल्या शैक्षणिक पदवीच्या प्रारंभाने   सुशिक्षित रोजगार प्रदाते विज्ञानकुशल उद्योजक बनण्याच्या युगात प्रवेश करत आहोत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान(स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोवेटीव्ह रिसर्च(AcSIR)च्या सातव्या पदवीदान समारंभाला संबोधित करत होते. रोजगारक्षम असलेल्या विज्ञानातील पदवी देणारी आणि उद्योजकतेच्या बारकाव्यांचा समावेश असणारा अभ्यासक्रम असलेली ही अकादमी म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले. 2011 मध्ये सुरुवात झाल्यापासून केवळ 12 वर्षांच्या कालखंडात एसीएसआयआर ही संस्था डॉक्टरल शिक्षण देणारी देशातील सर्वात मोठी संस्था म्हणून उदयाला आली आहे, असे त्यांनी सांगितले.

केवळ संख्यात्मक दृष्ट्या नव्हे तर गुणात्मक दृष्ट्या देखील या संस्थेने उत्कृष्टतेचे त्याचबरोबर नवोन्मेषाचे मानक कायम राखले आहेत आणि त्याच वेळी विज्ञान क्षेत्रातील विविध विषयांमध्ये व्याप्ती वाढवली आहे. ही संस्था उत्कृष्ट, नवोन्मेषी आणि अष्टपैलू देखील आहे,” डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

एसीएसआयआर ही डॉक्टरल संशोधनासाठीची भारतातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून 2022 मध्ये तिने 577 पीएचडी पदव्या प्रदान केल्या आणि सध्या या संस्थेत 7000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी नोंदणी केली आहे.

उद्योग आणि आपले वैज्ञानिक उपक्रम यांच्यातील संबंध संस्थात्मक करण्याचे आवाहन करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की यामुळे शाश्वत स्टार्टअप्स निर्माण होण्यास मदत होईल.

सध्या देश अनुभवत असलेली स्टार्ट अप चळवळ आपण शाश्वत केली पाहिजे, देशातील एक लाखांपेक्षा जास्त स्टार्ट अपना शाश्वत करण्यासाठी आपल्याकडे अतिशय भक्कम उद्योग असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.   

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975430) Visitor Counter : 113


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu