सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, 08 नोव्हेंबर, 2023 रोजी बुधवारी नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) द्वारे आयोजित सेंद्रीय उत्पादन प्रोत्साहनविषयक राष्ट्रीय परिसंवादाला करणार संबोधित


अमित शाह एनसीओएलचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे करतील प्रकाशन. एनसीओएल सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे शहा यांच्या हस्ते होणार वितरण

Posted On: 06 NOV 2023 3:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह बुधवार, 08 नोव्हेंबर, 2023 रोजी बुधवारी नवी दिल्लीतील पुसा येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये नॅशनल को ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) द्वारे आयोजित सेंद्रीय उत्पादन प्रोत्साहनविषयक राष्ट्रीय परिसंवादाला संबोधित करतील. याप्रसंगी अमित शाह एनसीओएलचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकही प्रकाशित करतील, तसेच एनसीओएल सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रही बहाल करतील. एकदिवसीय परिसंवादात एनसीओएलची उद्दिष्टे, सेंद्रीय उत्पादनांचे महत्त्व तसेच अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकारी संस्थांची भूमिका यावर चर्चा केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सहकार से समृद्धीया संकल्पनेनुसार,भारताला सेंद्रीय उत्पादनांमध्ये जागतिक अग्रेसर बनवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी संस्था म्हणून एनसीओएल ची स्थापना करण्यात आली आहे.

आजपर्यंत, सुमारे 2,000 सहकारी संस्था आधीच एनसीओएल च्या सदस्य झाल्या आहेत किंवा त्यांनी सदस्यत्वासाठी अर्ज केले आहेत.

सेंद्रीय उत्पादन काळाची गरज, प्रमाणीकरण प्रक्रिया आणि सेंद्रीय उत्पादनांसाठीचे निकष, सेंद्रीय प्रमाणन प्रयोगशाळांचे महत्त्व इत्यादी विषयांवरही या परिसंवादात तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. एनसीओएल चे सदस्य; भारत सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश सरकारचे अधिकारी; बहु राज्य सहकारी संस्था, वित्तीय संस्था, सहकारी संघ, जिल्हा सहकारी संघ, सेंद्रीय उत्पादन प्रमाणन संस्था, चाचणी प्रयोगशाळा तसेच सेंद्रीय उत्पादन क्षेत्रातील तज्ञ आणि देशभरातील इतर भागधारक यांच्यासह 1000 हून अधिक सहभागी या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या परिसंवादात दूरदृश्य प्रणालीमार्फत देखील मोठ्या संख्येने सहभागी सामील होणार आहेत.

बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 अंतर्गत एनसीओएल ची नोंदणी 25 जानेवारी 2023 रोजी करण्यात आली आहे. देशातील तीन प्रमुख सहकारी संस्था- भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (NCCF), गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ मर्यादित (GCMMF) आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (NAFED) यांच्यासह भारत सरकारच्या दोन प्रमुख वैधानिक संस्था राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) यांनी संयुक्तरित्या एनसीओएल ला प्रोत्साहन दिले आहे.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975162) Visitor Counter : 87