ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारकडून  ₹ 27.50/किलोग्रॅम  एमआरपीवर ‘भारत आटा’ नावाच्या  गव्हाच्या पिठाची विक्री सुरू


केंद्रीय मंत्री  पियूष गोयल यांनी ‘भारत आटा’ या पिठाच्या  विक्रीसाठी 100 फिरत्या वाहनांना दाखवला  हिरवा झेंडा

भारत' आटा  केंद्रीय भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ मर्यादित येथे देखील उपलब्ध

केंद्र सरकारच्या वारंवार हस्तक्षेपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिरावल्या :   गोयल

Posted On: 06 NOV 2023 4:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री,पियूष  गोयल यांनी आज नवी दिल्लीतली कर्तव्य पथ इथून  'भारत' ब्रँड अंतर्गत गव्हाच्या पिठाच्या विक्रीसाठी 100 फिरत्या वाहनांना  हिरवा झेंडा दाखवला. हे पीठ ₹ 27.50/Kg पेक्षा जास्त नसलेल्या एमआरपीवर उपलब्ध असेल. सामान्य ग्राहकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने उचललेल्या अनेक पावलांपैकी हे अलीकडील  पाऊल आहे. त्यांनी भारतब्रँडच्या गव्हाच्या पिठाची  किरकोळ विक्री सुरू केल्याने बाजारात परवडणाऱ्या दरात पुरवठा वाढेल आणि या महत्त्वाच्या खाद्यपदार्थाच्या किमती सतत नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

'भारत' आटा  केंद्रीय भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (नाफेड ) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ मर्यादित (एनसीसीएफ)  सर्व प्रत्यक्ष  आणि फिरत्या विक्री स्थानावर उपलब्ध होईल . आणि इतर सहकारी/किरकोळ विक्री केंद्रांमध्ये याचा विस्तार केला जाईल.

गव्हाचे पिठामध्ये रूपांतर करण्यासाठी   आणि ₹ 27.50/किलोग्रॅम  पेक्षा जास्त नसलेल्या एमआरपी  वर 'भारत आटा' ब्रँड अंतर्गत हे पीठ लोकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने , 2.5  लाख मेट्रिक टन  गहू @ Rs.21.50/किलोग्रॅम हे निम-शासकीय आणि सहकारी संस्थांसाठी म्हणजेच केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि नाडेफसाठी   खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत वितरित  करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना  गोयल यांनी सांगितले कीकेंद्राच्या हस्तक्षेपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिरावल्या आहेत. टोमॅटो आणि कांद्याचे भाव कमी करण्यासाठी यापूर्वी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.याव्यतिरिक्त, केंद्र ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय भांडार, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून  60 रुपये प्रति किलो भारत  डाळ देखील उपलब्ध करून देत  आहे. या सर्व प्रयत्नांचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाल्याचे सांगताना केंद्रामार्फत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यानंतर तो ग्राहकांना अनुदानित दरात दिला जात असल्याचे गोयल यांनी नमूद केले. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे विविध वस्तूंच्या किमती स्थिरावल्या आहेत यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना मदत करण्याचा नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे.

पार्श्वभूमी:

शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याची खातरजमा करताना अत्यावश्यक अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

केंद्रीय भांडार, नाफेड आणि एनसीसीएफ या 3 एजन्सींकडून कांदे 25 रुपये प्रति किलो दराने विकण्याबरोबरच भारत डाळ (चणा डाळ) 1 किलो पॅकसाठी 60 रुपये प्रति किलो दराने आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो दराने त्यांच्या प्रत्यक्ष आणि/किंवा किरकोळ दुकानांद्वारे विक्री सुरू करण्यात आली आहे.  आता, ‘भारतब्रँडच्या गव्हाच्या पिठाची विक्री सुरू झाल्यामुळे, ग्राहकांना या दुकानांतून पीठ, डाळ आणि कांदे रास्त आणि किफायतशीर किमतीत मिळू शकतील.

टीपीडीएस अंतर्गत समाविष्ट नसलेल्या सामान्य ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. भारत आटा’, ‘भारत डाळआणि टोमॅटो आणि कांद्याची परवडणाऱ्या आणि रास्त दरात विक्री हा असाच एक उपाय आहे. आत्तापर्यंत 59183 मेट्रिक टन डाळ विकली गेली आहे, ज्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत आहे.

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेंतर्गत (ओएमएसएस (डी)) गव्हाच्या विक्रीसाठी देशव्यापी साप्ताहिक ई-लिलाव आयोजित करत आहे. या साप्ताहिक ई-लिलावामध्ये फक्त गिरणीवाले (पिठाची गिरणी/रोलर आटा गिरण्या) भाग घेऊ शकतात. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसार एफसीआय अनुक्रमे @ 21502125 प्रति क्विंटल दराने एफएक्यू आणि यूआरएस गहू विक्रीसाठी देत आहे. खरेदी केलेला गहू थेट प्रक्रिया करून सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत दिला जावा, हा सरकारचा हेतू असल्याने व्यापाऱ्यांना ई-लिलावात सहभागी होण्याची परवानगी नाही. प्रत्येक बोलीदार साप्ताहिक ई-लिलावात 200 एमटी पर्यंत गहू घेऊ शकतो. एफसीआय देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेंतर्गत साप्ताहिक ई-लिलावात 3 लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी देत आहे. आतापर्यंत, सरकारच्या निर्देशांनुसार एफसीआय द्वारे 65.22 लाख मेट्रिक टन गहू आधीच खुल्या बाजारात उतरवण्यात आला आहे.

***

S.Patil/S.Chavan/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975149) Visitor Counter : 195