गृह मंत्रालय
स्वच्छता संस्थात्मक करण्याच्या आणि सरकारमधील प्रलंबितता कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृहमंत्रालयाने यशस्वीरित्या राबवली विशेष मोहीम 3.0.
गृहमंत्रालयाने जवळपास सर्वच उद्दिष्टे केली 100% साध्य, सुमारे 167240 चौरस फूट क्षेत्र केले मोकळे आणि 95000 हून अधिक भौतिक नस्तीं केल्या बाद, भंगार विल्हेवाटीने 5.82 कोटी रुपयांचा मिळवला महसूल
गृहमंत्रालयाच्या सर्व ठिकाणी 10,274 मोहिमा आल्या राबवण्यात, सीएपीएफ, यूटी आणि सीपीओ ने या मोहिमेत घेतला उत्साहाने भाग आणि यशात उचलला मोलाचा वाटा
Posted On:
02 NOV 2023 3:50PM by PIB Mumbai
स्वच्छता संस्थात्मक करण्याच्या आणि सरकारमधील प्रलंबितता कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृहमंत्रालयाने (एमएचए) विशेष मोहीम 3.0 यशस्वीरित्या राबवली. ही मोहीम 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यात प्रलंबितता दूर करणे, उत्तम जागा व्यवस्थापन आणि शाश्वत वातावरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
केंद्रीय गृहमंत्री, राज्यमंत्री आणि गृह सचिव यांनी वैयक्तिकरित्या या मोहिमेच्या प्रगतीचे सर्वोच्च स्तरावर नियमित निरीक्षण केले. एका समर्पित संचाद्वारे दैनंदिन प्रगतीचे परीक्षण केले गेले. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या SCPDM पोर्टलवर याची माहिती रोज अपलोड करण्यात आली.
गृहमंत्रालयाने जवळपास सर्वच उद्दिष्टे 100% साध्य केली. सुमारे 167240 चौरस फूट क्षेत्र मोकळे केले आणि 95000 हून अधिक भौतिक नस्तीं मार्गी लावल्या. भंगार विल्हेवाटीतून 5.82 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गृहमंत्रालयाच्या सर्व ठिकाणी 10,274 मोहिमा राबवण्यात आल्या. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रशासित प्रदेश (यूटी) आणि केंद्रीय पोलीस संघटनेने (सीपीओ) या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला आणि यशात मोलाचा वाटा उचलला.
स्वच्छता, प्रलंबितता दूर करणे इत्यादीसाठी हाती घ्यावयाची उद्दिष्टे ओळखण्यासाठी 15 सप्टेंबर 2023 पासून तयारीच्या टप्प्यासह मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मोहिमेदरम्यान, जागा व्यवस्थापन आणि कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी अनुभव वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
***
S.Patil/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974221)
Visitor Counter : 148