निती आयोग

प्रादेशिक नवोन्मेष  आणि उद्यमशीलता कार्यक्षेत्राच्या  विकासाला चालना देण्यासाठी  नीती आयोगाकडून अटल नवोन्मेष अभियानाच्या माध्यमातून   राज्यस्तरीय नवोन्मेष कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 02 NOV 2023 12:38PM by PIB Mumbai

 

संपूर्ण देशामध्ये  नवोन्मेष आणि उद्यमशीलता कार्यक्षेत्राच्या  विकासाला  चालना देण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी  धोरणात्मक वाटचालीचा  एक  भाग म्हणून   राज्य-स्तरीय नवोन्मेष कार्यक्षेत्राच्या  विकासावर लक्ष केंद्रित करणारी पीअर-टू-पीअर कार्यशाळाआयोजित करण्यासाठी   अटल नवोन्मेष अभियान  सज्ज आहे.

नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळुरू   (आयआयएम बंगळुरू ) येथे 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान ""राज्य-स्तरीय नवोन्मेष कार्यक्षेत्र  निर्माण करणे"  हा आगामी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  हा तीन दिवसीय कार्यक्रम देशभरातील  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला  प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने  एकत्र येण्यासाठी, सूक्ष्म दृष्टीकोनाची  देवाणघेवाण   आणि धोरणे तयार करण्यासाठी एक अनोखा मंच  प्रदान करेल.

जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये  अलीकडेच भारताने   81 व्या स्थानावरून 40 व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे हे देशाच्या व्यापक नवोन्मेष  सामर्थ्याला अधोरेखित करते, असे अटल नवोन्मेष अभियानाचे अभियान संचालक डॉ चिंतन वैष्णव यांनी गुरुवारी नवी दिल्लीत  आयोजित कार्यक्रमापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले. ही  उल्लेखनीय कामगिरी पुढे अशीच सुरु ठेवण्यासाठी  आणि अव्वल 25 मध्ये येण्यासाठी, भारतातील विविध राज्यांनी त्यांच्या विशिष्ट सामर्थ्यांनुसार आणि स्थानिक संदर्भानुसार, लवचिक नवोन्मेष आणि उद्यमशीलता कार्यक्षेत्र  तयार करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. हे कार्यक्षेत्र प्रादेशिक उद्योगांना बळकट करण्यासाठी, आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल .”, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने सक्षम  नवोन्मेष आणि उद्यमशीलता कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी भारतभरातील राज्यांनी यापूर्वीच आपला  प्रवास सुरू केला आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.परिणामी, राज्य-स्तरीय मॉडेल्सचा एक समूह उदयाला  आला आहे, प्रत्येक समूहाने  स्वतःचा सूक्ष्म दृष्टिकोन  आणि कर्तबगारी दाखवलेली आहे. .  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये परस्पर माहितीच्या  सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी, त्यांच्याशी  संबंधित राज्य-स्तरीय नवोन्मेष आणि उद्यमशीलता कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्याच्या अनुषंगाने, सामायिक वचनबद्धता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या राज्यस्तरीय कार्यशाळेची रचना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

प्रत्येक राज्य-स्तरीय कार्यक्षेत्राला  पुढे नेण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये  सूक्ष्म ज्ञान   वर्धनासाठी सामर्थ्य  निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे

राज्य/केंद्रशासित प्रदेश-स्तरीय नवोन्मेष आणि उद्यमशीलता  मॉडेल्सची देवाणघेवाण करण्याव्यतिरिक्त, सहभागी कल्पना, रणनीती आणि अनुभवांची देवाणघेवाण करतील तसेच यशस्वी अंमलबजावणी आणि नवोन्मेषी कार्यक्षेत्र   तयार करण्यासाठी त्यांनी मिळवलेली माहिती  प्रदर्शित करतील.

या शिवाय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश-स्तरीय कार्यक्षेत्र निर्मितीचे एक गतिमान जाळे निर्माण करणे  हे  कार्यशाळेचे उद्दिष्ट असून कार्यशाळेच्या पलीकडे जाऊन सहकार्य करणे, विचार विनिमय  करणे आणि प्रगती  सुरू ठेवता येणार आहे. या कार्यशाळे दरम्यान सहभागी कर्नाटक नवोन्मेष कार्यक्षेत्राच्या  काही भागांनाही भेट देतील.

***

N.Meshram/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974137) Visitor Counter : 71