ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
कांद्याच्या किमान निर्यातमूल्यातील केंद्राच्या हस्तक्षेपामुळे देशांतर्गत बाजारातील भाववाढ आटोक्यात
किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त साठ्यातून विक्री आणि अतिरिक्त खरेदी
Posted On:
30 OCT 2023 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता राखण्यासाठी आणि निर्यातीपासून परावृत्त करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्याचे किमान निर्यात मूल्य 800 अमेरिकी डॉलर प्रति टन ठेवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या बाजारातील किंमतीत गेल्या आठवड्यातील उच्च भावाच्या तुलनेत 5% ते 9% घसरण होऊन तात्काळ परिणाम दिसून आला. महाराष्ट्रातील सर्व बाजारातील कांद्याच्या सरासरी किंमतीत 4.5% ने घट झाली आहे आणि विक्री केंद्रांमध्येही अशीच घसरण दिसून आली आहे.
स्थिर देशांतर्गत किमती आणि ग्राहकांना उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग दररोज कांद्याच्या निर्यातीवर आणि किमतींवर लक्ष ठेवत आहे. नोव्हेंबर महिन्यात वाढती मागणी लक्षात घेता, विभागाने कांद्याचा अतिरिक्त साठा मंडी विक्रीद्वारे आणि चढ्या किमतीच्या केंद्रांवर किरकोळ ग्राहकांना सवलतीच्या दराने विक्रीद्वारे बाजारात उतरवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 170 शहरांमध्ये 685 फिरत्या किरकोळ दुकानाद्वारे किरकोळ विक्रीचा समावेश आहे. नाफेड आणि एनसीसीएफ ने कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खरीप हंगामातील अतिरिक्त 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973185)
Visitor Counter : 97