दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“नॅशनल ब्रॉडकास्टिंग पॉलिसी” तयार करण्यासाठीच्या इनपुट्सवर 'ट्राय'च्या सल्लामसलत-पूर्व मसुद्यावरील टिप्पण्या स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत वाढ

Posted On: 30 OCT 2023 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय )ने 21 सप्टेंबर 2023 रोजी नॅशनल  ब्रॉडकास्टिंग पॉलिसी तयार करण्यासाठीच्या इनपुट्सवर सल्लामसलत-पूर्व  मसुदा जारी केला होता. या मसुद्यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात भागधारकांकडून देण्यात येणाऱ्या टिप्पण्या स्वीकारण्यासाठी आधी 10 ऑक्टोबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

टिप्पण्या स्वीकारण्याची अंतिम मुदत वाढवण्यासाठी भागधारकांनी केलेल्या विनंत्यांनंतर लिखित स्वरूपातील टिप्पण्या स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली.

आता, भागधारकांकडून उपरोल्लेखित सल्लामसलत-पूर्व  मसुद्यावर टिप्पण्या किंवा सूचना सादर करण्याची मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आल्यानंतर, टिप्पण्या सादर करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवून देण्यात आली असून आता यासाठी 7 नोव्हेंबर 2023 ही  अंतिम तारीख असेल. टिप्पण्या अथवा सूचना सादर करण्यासाठीची कालमर्यादा वाढवण्यासाठी यापुढे करण्यात आलेली कोणतीही विनंती मान्य करण्यात येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सदर टिप्पण्या  advbcs-2[at]trai[dot]gov[dot]in  आणि jtadvbcs-1[at]trai[dot]gov[dot]in  या दोन ईमेल आयडी वर पाठवता येतील. अधिक तपशील किंवा माहितीसाठी कृपया ट्राय  सीएसआरचे महासंचालक आणि सल्लागार (बी&सीएस) अनिल भारद्वाज यांच्याशी +91-11-23237922 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973046) Visitor Counter : 113


Read this release in: Hindi , Urdu , Telugu , English , Tamil